Dussehra 2024: दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा हा सण साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, विजयादशमी यंदा 12 ऑक्टोबर रोजी साजरी होत आहे. या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून वाईटाचा अंत केला. त्यामुळे हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. हिंदू शास्त्रानुसार आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे. या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या करु नये. नाहीतर, त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात… तर दसऱ्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहीजे जाणून घेऊ…
वरिष्ठांचा अपमान – अनेकदा घरात असलेल्या वरिष्ठ सदस्यांना रागात काही बोलण्यात येत आणि त्यांचा अपमान होतो. असं व्हायला नको. विशेषतः दसऱ्याच्या दिवशी घरातील वरिष्ठांचा अपमान व्हायला नको… याची काळजी घेतली पाहिजे. आजच्या दिवशी घरातील वरिष्ठांचा सन्मान आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला हवेत.
शुभ मुहूर्तावर करा कार्याची सुरुवात – दसऱ्याच्या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य करणार असाल तर लक्षात ठेवा की ते शुभ मुहूर्तावरच करावे. कारण शास्त्रानुसार शुभ मुहूर्त न घेता कोणतेही काम सुरू केल्यास यश मिळण्याची शक्यता कमी असते.
घरातील वास्तूकडे नका करु दुर्लक्ष – दसऱ्याच्या दिवशी घर स्वच्छ ठेवा. घरातील मुख्य दरवाजा स्वच्छ असायला हवा. घरातील भींतींना लागलेले जाळे देखील स्वच्छ करायला हवेत. दसऱ्याच्या दिवशी घरातील वास्तूकडे दुर्लक्ष करू नका.
झाडे तोडणे – दसऱ्याच्या दिवशी चुकूनही झाडे तोडू नयेत. हे अत्यंत अशुभ मानलं जातं. त्याऐवजी घरात नवीन रोपे आणून दसऱ्याच्या दिवशी लावू शकता. असे केल्याने तुमच्या जीवनात समृद्धी आणि आनंद येतो.
पूजा – दसऱ्याच्या दिवशी भगवान राम आणि माता दुर्गा यांची पूजा केली जाते. पण तुम्ही भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची एकत्र पूजा देखील करू शकता. भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. याशिवाय आर्थिक स्थितीही चांगली राहते. अशी देखील मान्यता आहे.