मुंबई : भगवान रामाने रावणाचा वध केला ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण सर्व काही असताना रावण यश मिळाले नाही. यामागे त्याला मिळालेले अनेक श्राप होते.रावणाने आयुष्यभर अशी कर्मे केली, ज्यामुळे त्याला अनेक लोकांचा शाप सहन करावा लागला. रावणाला अनेक लोकांकडून श्राप मिळाले होते. हेच श्राप पुढे जावून रावणाच्या नाशाचे कारण बनले. चला तर मग जाणून घेऊया लंकापती रावणाल कोणी श्राप दिले होते.
रघुवंशात अनरण्या नावाचा राजा होता. जेव्हा रावण जगावर विजय मिळवण्यासाठी निघाला होता, तेव्हा रावण आणि राजा अनरण्य यांच्यात युद्ध झाले.राजा अनरण्या या युद्धात मारला गेला पण मरण्यापूर्वी त्याने रावणाला शाप दिला होता.
एकदा रावण भगवान शिव यांना भेटण्यासाठी कैलास पर्वतावर गेला होता. कैलासमध्ये रावणाने शिवाचे वाहन असलेल्या नंदी बैलाची खिल्ली उडवली. रावणाला माहीत नव्हते की नंदी हा सामान्य बैल नाही आणि त्याच्याकडे अफाट शक्ती आहेत. संतप्त नंदीने स्वतःची चेष्टा केल्याबद्दल रावणाला शाप दिला. असे पुराणामध्ये लिहले आहे.
एकदा रावण आपल्या पुष्पक विमानात प्रवास करत होता, तेव्हा त्याने एका सुंदर स्त्रीला पाहिले. ती महिला तेव्हा भगवान विष्णूची पूजा करत होती. रावणाने स्त्रियांचा आदर केला नाही. त्याने त्या महिलेचे केस ओढले आणि तिला तिच्याबरोबर जाण्याचा आदेश दिला. महिलेने तिथं आपला जीव सोडला आणि मरण्यापूर्वी रावणाला शाप दिला.
रावणाने जगावर विजय मिळवण्याच्या ध्येयाने स्वर्गाला गेला. तेथे रंभा नावाच्या अप्सरावर रावण मोहित झाला. परंतू रांभेला रावणाच्या मोठा भाऊ कुबेरच्या मुलगा नलकुबेरशी लग्न करायचे होते. रंभाच्या इशाऱ्यानंतरही रावणाने पालन केले नाही. नलकुबेरला जेव्हा हे कळले तेव्हा तो खूप रागावला आणि रावणाला शाप दिला.
रावणाला त्याची प्रिय बहीण शूर्पणखाचा शापही मिळाला होता. शूर्पणखाच्या पतीचे नाव विद्युतजिह्वा होते आणि तो राजा कालकेयाचा सेनापती होता. कालकेयाशी झालेल्या युद्धामध्ये रावणाने विद्युतजिह्वाचा वध केला होता, त्यामुळे रागाने शूर्पणखेने रावणाला शाप दिला.
रावणाची पत्नीच्या मोठ्या बहीणीवरवाईट नजर होती. मायाचा पती शंभर वैजंतपूरचा राजा होता. एके दिवशी रावण शंभरला भेटायला गेला आणि तिथे मायाला त्याच्या जाळ्यात अडकवले. शंभरला हे कळल्यावर त्याने रावणाला कैद केले. त्यावेळी राजा दशरथाने रावणावर हल्ला केला.शंभर युद्धात मरण पावला. यानंतर मायाने तिचा जीव सोडण्याचा निर्णय घेतला.रावणाने मायाला त्याच्यासोबत येण्यास सांगितले. तेव्हा मायाने रावणाला शाप दिला.
आधुनिक ते ऐतिहासिक शस्त्रांपर्यंत…राज्यभरात दिमाखात साजरा होतोय शस्त्रपूजन सोहळा
Garuda Purana : ‘या’ शुभ गोष्टी चुकीच्या वेळी कधीच करु नका; कुटुंबाला येऊ शकतात समस्या
आधुनिक ते ऐतिहासिक शस्त्रांपर्यंत… राज्यभरात दिमाखात साजरा होतोय शस्त्रपूजन सोहळाhttps://t.co/9GHewDePm9#dussehra2021| #happydussehra | #Dussehra
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 15, 2021