Dussehra2021 | फुलांचा दरवळ, भक्तीचा नाद, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील आराध्य दैवतांचे गाभारे सजले
विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण. हा सण वेगवेगळ्या कारणांसाठी देशाच्या विविध भागात साजरा केला जातो. काही भक्त तो विजया दशमी म्हणून साजरा करतात, दुर्गा पूजेचा शेवट, देवी दुर्गाचा महिषासुर राक्षसावर विजय म्हणून साजरा करतात. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील विविध मंदिरांमध्ये आकर्षक सजावट केली आहे. चला तर मग दर्शन घेऊया महाराष्ट्रातील आराध्य दैवतांचे.
1 / 5
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात दसऱ्याच्या निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मंदीरात सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत आहे, दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक समाधी मंदिरात दर्शनासाठी उपस्थित राहत असतात परंतू कोरोनाच्या निर्बंधामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मुख दर्शनाचीच व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी मंदिरात विधिवत पूजा अर्चा केल्या नंतर आरती करण्यात आली असल्याची माहिती देवस्थान समितीचे व्यवस्थापकांनी दिली.
2 / 5
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरानाकाळा नंतर दोन वर्षानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. यावेळी दर्शनासाठी जवळपास पन्नास हजार भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.
3 / 5
सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. शुद्ध सोन्यात बनवलेली ही साडी सुमारे १६ किलो वजनाची आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी गर्दी केलीये.दक्षिण भारतातील कारागिरांनी १० वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते.
4 / 5
विजयादशमी निमित्ताने आज संत तुकाराम महाराज मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आला आहे. यावेळी विविध देशी-विदेशी फुलांनी तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक सजावट
5 / 5
दसऱ्याच्या निमित्ताने आज गणपतीपुळे मंदिरामध्ये गणरायाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. यावेळी गणपती बाप्पच्या समोर मोदकांचा प्रसाद देखील ठेवण्यात आला होता.