मुंबई : इस्लाम धर्मातील त्यागाचा पवित्र भावनेचा उत्सव बकरी ईद 2021 (Bakrid 2021) आज साजरा केला जात आहे. बकरी ईद किंवा ईद-उल-जुहा (Eid ul adha 2021) चा सण मुस्लिम समाजासाठी विशेष महत्त्वाचा असतो. हा उत्सव कुर्बानीशी संबंधित आहे. कुर्बानीचा खरा अर्थ एक असे बलिदान जे इतरांसाठी करण्यात येते. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर अंदाजे 70 दिवसानंतर बकरी ईद साजरी केली जाते. चला बकरी ईदच्या सणाशी संबंधित कुर्बानीची कहाणी जाणून घेऊया (Eid al-Adha 2021 Know The Story Of Kurbani Ani Importance Of This Day In Islam)-
बकरी ईदच्या या दिवशी खुदासाठी बकरीचा बळी दिला जातो. असे मानले जाते की बकरी ईदचा उत्सवाची सुरुवात हजरत इब्राहिमपासून सुरु झाला, जे अल्लाहचे पैगंबर होते. मान्यता आहे की एकदा फरिश्तांच्या सांगण्यावरुन अल्लाहने हजरत इब्राहिमची परीक्षा घेतली. यापूर्वी हजरत इब्राहिमच्या जागी मोठ्या दुआनंतर मुलाचा जन्म घेतला होता. एकदा हजरत इब्राहिमला स्वप्नात हुक्म मिळाला की त्याने स्वत:ला अल्लाहच्या मार्गात त्याग-कुर्बान करावे. त्याने ते कर्तव्य पार पाडले. दुसऱ्या रात्रीही त्याला हेच स्वप्न पडले, म्हणून त्याने सकाळी होताच त्याचे कर्म केले.
तिसर्या रात्री हजरत इब्राहिमला हुक्म मिळाला की त्याने आपल्या सर्वात प्रिय वस्तुला अल्लाहच्या मार्गात कुर्बान करावे. एखाद्या व्यक्तीला आपल्या मुलावर सर्वात जास्त प्रेम असते. हजरत इब्राहिमने आपल्या कर्तव्याचं निर्वहन करत आपला मुलगा इस्माईलची कुर्बानी देण्यास तयार झाले. यानंतर, जेव्हा त्यांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून आणि आपल्या मुलगा इस्माईलची कुर्बानी देण्यासाठी चाकू उचलला त्याचवेळी फरिश्तांचा प्रमुख जिब्रील अमीन यांनी इस्माईलला हटवून त्याठिकाणी ठेवले. अशाप्रकारे इस्लाम धर्मात हजरत इब्राहीम यांच्याद्वारे पहिली कुर्बानी देण्यात आली.
हजरत इब्राहीमच्या काळापासून ते आजतागायत हा कुर्बानीचा सण ईद-उल-जुहा (Eid ul adha 2021) म्हणून जगभर साजरा केला जातो. दरवर्षी साजरा होणार्या बकरी ईद सणाच्या निमित्ताने, ज्या बकरीची कुर्बानी दिली जाते त्याच्या मांसला तीन भागात विभागले जाते. त्यातील एक भाग गरिबांसाठी, दुसरा भाग मित्र आणि नातेवाईकांसाठी आणि तिसरा भाग आपल्या कुटुंबासाठी ठेवला जातो. बकरी ईदचा सण आपल्याला त्याग आणि बलिदानाबद्दल शिकवते.
मुस्लिम धर्मात 786 या संख्येला महत्त्वाचे स्थान का? काय आहे नेमका अर्थ, जाणून घ्या#Islam https://t.co/9z20nzm1ty
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2021
Eid al-Adha 2021 Know The Story Of Kurbani Ani Importance Of This Day In Islam
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
बकरी ईदला नमाज पढण्यासाठी 50 जणांना परवानगी द्या; रामदास आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Bakrid 2021 Guidelines Maharashtra : ईदची नमाज घरीच, बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जारी