EYE | ‘आँखों की गुस्ताखियां’ डोळे सांगतात तुमच्या मनातील गोष्टी, जाणून घ्या तुमचे डोळे काय सांगतात?
एखादी व्यक्ती प्रत्येक गोष्ट बोलेलच असे नाही पण माणसाचे डोळे मनातील सर्व गोष्टी बोलतात. समुद्रशास्त्रात डोळ्यांच्या रंगावरुन व्यक्तीला ओळखण्याची कला सांगण्यात आली आहे. समुद्रशास्त्रात अनेक पद्धतींचे वर्णन केले आहे. उदाहरणार्थ, शरीराच्या विशिष्ट भागाच्या रचनेवरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखण्यासाठी मदत होते. ज्याप्रमाणे हात, पाय, चेहऱ्याचा आकार, शरीरावरील तीळाच्या खुणा व्यक्तीचे भविष्य सांगतात, त्याचप्रमाणे डोळेही बरेच काही सांगतात. चला तर मग जाणून घेऊयात.