मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये बृहस्पती हा सुख, समृद्धी आणि सौभाग्याचा कारक मानला जातो. या देवाच्या पुजा अत्यंत शुभ मानली जातात. बृहस्पती हा ग्रह ज्ञान आणि सौभाग्याचा कारक मानला जाते. भारतात भगवान बृहस्पतीच्या देशात अनेक सिद्ध मंदिरे आहेत. असेच एक सिद्ध मंदिर तामिळनाडूमधील कुंभकोणमजवळ अलंगुडी येथे आहे.
अलंगुडी येथे असलेल्या देवगुरूचे मंदिर दक्षिणमुखी म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात बृहस्पती शिवाय भगवान शंकर, सूर्यदेव,आणि सप्तऋषी यांचीही मंदिरे आहेत. तमिळनायडू मधिल या बृहस्पती देवाच्या या मंदिराची स्थापना सातव्या शतकात पल्लवांच्या काळात झाली असे मानले जाते. त्यानंतर चोल शासकांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
देवगुरु बृहस्पतीच्या या मंदिराविषयी असे मानले जाते की जो व्यक्ती या मंदिराची 24 प्रदक्षिणा करतो, त्याच्यावर देवगुरु बृहस्पतीची विशेष कृपा होते आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. या पवित्र ठिकाणी येऊन बृहस्पती देव, ज्यांना एके काळी देवांचे गुरु म्हटले जाते, त्यांनी भगवान शंकराची विशेष पूजा केली होती. त्यानंतर त्यांना नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ होण्याचा मान मिळाला.
एका राजाला सात पुत्र होते . ज्या राजाने एका ब्राह्मणाचा अपमान केला होता. यामुळे त्याचे संपूर्ण राज्य लयास गेले आणि तो गरीब झाला. यानंतर आस्थेने राजाचा धाकटा मुलगा आणि सून येथे आले आणि त्यांनी देवगुरूंची पूजा केली. त्यानंतर त्यांचे हरवलेले सर्व साम्राज्य परत मिळाले. तेव्हापासून अशी श्रद्धा आहे की जो या ठिकाणी येऊन देवगुरु बृहस्पतीची भक्तिभावाने पूजा करतो तो कधीही रिकाम्या हाताने जात नाही अशी मान्यता आहे.
(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
इतर बातम्या
चमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत