अनेक गोष्टींबाबत नेहमी अनेक अख्यायिका असतात. त्याची मनात सतत भीती असते. त्याची जर अध्यात्माशी सांगड घातली तर मग बघायलाच नको. लोकांच्या मनात अजून धास्ती बसते. चीनच्या फेंगशुई वास्तूशास्त्रात अशा अनेक गोष्टी आहेत. आज या फेंगशुईच्या टिप्सनुसार शेकडो लोक घर व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतात. घरात बरकत राहावी, कोणतंही संकट येऊ नये म्हणून लोकांचा अटापिटा असतो. घराचा दरवाजा कुठे असावा इथपासून ते आरसा कुठे ठेवावा इथपर्यंत लोक काळजी घेताना दिसतात. एवढेच नव्हे तर पलंगाच्या खाली कोणत्या वस्तू असाव्यात आणि असू नये याचीही खबरदारी लोक घेताना दिसत आहेत.
फेंगशुई टिप्सनुसार वास्तू दोषामुळे एखादी व्यक्ती कंगाल होऊ शकते. तुमच्या पलंगाखाली जर काही वस्तू असतील तर त्यामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता. तुमचं मानसिक स्वास्थ हरवलं जाऊ शकतं. त्यामुळे पलंगाखाली काही वस्तू असू नये असं फेंगशुई सांगते. पलंगाखाली काय ठेवल्याने काय होतं, यावर टाकलेला हा प्रकाश.
काही लोक पलंगाखाली बॉक्स तयार करतात. सामान ठेवण्यासाटी पलंगाखाली बॉक्स बनवला जातो. प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टी किंवा वस्तू या बॉक्समध्ये ठेवल्या जातात. अशा प्रकारचे डिझाईनच आजकाल मार्केटमध्ये आले आहेत. पण पलंगाखाली बॉक्स असलेले पलंग न घेतलेलेच बरे. कारण फेंगशुई टिप्समध्ये असे पलंग अशुभ मानले जातात.
फेंगशुईच्या मते आपण ज्या पलंगावर झोपतो, त्याच्या खाली काहीच असता कामा नये. मग ती वस्तू छोटी असो वा मोठी, झोपताना पलंगाखाली या वस्तू असताच कामा नये. अशा वस्तू मानसिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करत असतात.
फेंगशुईनुसार झोपताना आपल्या पलंगाखाली ज्या प्रकारची वस्तू असते त्यानुसार आपल्या मन आणि मेंदूवर परिणाम होत असतो. जर पलंगाखाली घाण असेल, प्रचंड सामान असेल तर आपलं मन बैचेन होतं. या गोष्टीमुळे आर्थिक चणचणही निर्माण होते, असं फेंगशुई सांगते.
पलंगाखाली काही वस्तू असतील तर निवांत झोप लागत नाही. मन बैचेन होतं. काही तरी ओझं मनावर असल्याचं वाटतं. मानसिक त्रास होतो आणि दिवसभर व्यक्ती त्रस्त असतो. त्यामुळे झोप येत नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)