वास्तुशास्त्र टिप्स
Image Credit source: Social Media
प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख-समाधानाचे वातावरण हवे असते. वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा निरंतर टिकवून ठेवायची असेल तर घरात तुम्ही काही सजावटींच्या वस्तूंचा वापर करू शकता. लाफिंग बुद्धा (Laughing Buddha) सुद्धा अशाचं अनेक सकारात्मक वस्तूंपैकी एक आहे. असं म्हणतात की, लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवल्याने घरात आनंदाचं वातावरण तयार होते. याशिवाय यामुळे घरात सुख-समृद्धी सुद्धा येते. परंतु याला चुकिच्या ठिकाणी ठेवल्याने तुम्हाला नुकसान देखील होऊ शकतं.
घरात अशा प्रकारे ठेवा लाफिंग बुद्धा
खरंतर लाफिंग बुद्धाबद्दल अनेक गोष्टी प्रचलीत आहेत.जर कोणी आर्थिक समस्यांना तोंड देत असेल, घरात सतत उदास वातावरण असेल. अशावेळी लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेऊन तुम्ही तुमच्या समस्यांवर मात करू शकता.
वास्तू शास्त्रात लाफिंग बुद्धाला सुख-संपत्ती आणि प्रगतीचं प्रतीक मानले जाते. त्यामुळे याला घरात ठेवल्यामुळे आर्थिक संपन्नता आणि सकारात्मकता येते.
तुम्ही लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात, कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी ठेऊ शकता. परंतु या मूर्तीला कधीही जमीनीपासून अडीच फुट वर किंवा मुख्य दरवाज्याच्या अगदी समोर ठेवावे.
घरात लाफिंग बुद्धाच्या हसणाऱ्या मूर्तीला आनंद, सुख आणि समृद्धिचं प्रतीक मानलेलं आहे. लाफिंग बुद्धाचे पोट मोठे असते. असं म्हणतात की, त्या मूर्तीतील लाफिंग बुद्धाचे मोठे पोट संपन्नतेचं प्रतीक आहे. त्यामुळे या मूर्तीला घराच्या मुख्य दारासमोर ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते.
तसेच हातात किंवा पाठीवर धनाची पोटली घेतलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती चांगली मानली जाते.
वास्तू शास्त्रानुसार बेडरूम आणि स्वयंपाक घरात लाफिंग बुद्धाचा फोटो किंवा मूर्ती ठेऊ नये. कारण यामुळे घरात नकारात्मकता येते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)