मुंबई : आजच्या बदलत्या काळात प्रत्येकाला सुखी वैवाहिक जीवन (Married life) हवे आहे. मात्र, सध्याच्या काळात सुखी वैवाहिक जीवन मिळणे थोडे अवघड आहे. शंका, भांडणे आणि समजूतदारपणा नसल्यामुळे नात्यात वाद निर्माण होतात. जे सुखी वैवाहिक जीवनासाठी हानिकारक आहेत. वैवाहिक जीवन सुखी राहवे यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. मात्र, दिवसेंदिवस वाद वाढतच जातात.
जर आपण काही वास्तु टिप्स फाॅलो केल्यातर आपण आपले वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते. वास्तु टिप्समुळे वैवाहिक जीवन सुखी तर होईलच पण पती-पत्नीमधील परस्पर प्रेमही वाढेल. चला जाणून घेऊया वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी कोणत्या वास्तु टिप्स फाॅलो केल्या पाहिजेत.
वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी वास्तु टिप्स
1. बेडरूममध्ये खिडकी असावी. कारण त्यामुळे जोडप्यातील तणाव कमी होतो आणि नात्यात परस्पर प्रेम टिकून राहते. यामुळे आपल्या बेडरूमला खिडकी असणे खूप आवश्यक आहे.
2. बेडरूममध्ये आरसा ठेवणे वास्तूनुसार चांगले आणि योग्य मानले जाते. यामुळे पती-पत्नीमधील दुरावा कमी होऊन त्यांच्यातील प्रेम वाढते.
3. बेडरूममध्ये कधीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नका. कारण वास्तुनुसार यामुळे सकारात्मक ऊर्जा कमी होते. त्याचा तुमच्या नात्यावर परिणाम होतो. वाळलेल्या वनस्पती तुमच्या बेडरूममध्ये कधीही ठेवू नका. त्यामुळे पती-पत्नीमधील तणाव वाढतो.
4. पत्नीने नेहमी पतीच्या डाव्या बाजूला झोपावे आणि मोठी उशी वापरावी. त्यामुळे त्यांच्यातील परस्पर प्रेम वाढते.
5. पती-पत्नी ज्या खोलीत झोपतात. त्या खोलीचा रंग हलका गुलाबी किंवा हलका हिरवा असावा. गडद रंग कधीही वापरू नका. हलका गुलाबी आणि हलका हिरवा रंग आनंददायी मानला जातो. हे रंग तणाव कमी करण्यास आणि जोडीदाराला जवळ आणण्यास मदत करतात.
6. ज्या खोलीत पती-पत्नी झोपतात. त्या खोलीत देवदेवतांचे फोटो लावू नका. वास्तूनुसार मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. कारण ते शुक्राचे प्रतीक आहे. त्यामुळे पती-पत्नीचे नाते मधुर होऊन त्यांच्यात प्रेम वाढते.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन हे प्रसिध्द करण्यात आले आहे.)
संबंधित बातम्या :
Vastu: Vastu : नवीन वर्षात घर घेताय?, वास्तुनियमांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…
ज्योतिष टिप्स: नोकरी मिळण्यात अडचणी येत आहे? मग हे खास उपाय करून पाहा!