मुंबई : शास्त्रांमध्ये आठवड्याचे सात दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात. प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णूला (Lord Vishnu) समर्पित असतो. तर, शुक्रवारचा दिवस हा त्यांची पत्नी देवी महालक्ष्मीचा (Goddess Lakshmi) मानला जातो. शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मीला समर्पित असतो. शुक्रवारी भाविक वेगवेगळ्या प्रकारे लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. या दिवशी लक्ष्मी देवीची विधीपूर्ण पूजा केल्याने आर्थिक संकटं दूर होतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
ज्या घरात देवी लक्ष्मी प्रसन्न राहाते, त्या घरावरील सर्व संकटे दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीचे वर्णन संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणून करण्यात आले आहे. यामुळेच भाविक देवीची मनोभावे पूजा करतात. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्रांचा जप केला जातो. आज, शुक्रवारी जाणून घ्या देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या काही प्रभावी मंत्रांबाबत –
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या या आवडत्या मंत्रांचा जप करावा
श्री लक्ष्मी बीज मंत्र :
ॐ श्री ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मयै नमः।।
लक्ष्मी प्रार्थना मंत्र :
नमस्ते सर्वगेवानां वरदासि हरे: प्रिया।
श्री लक्ष्मी महामंत्र :
ॐ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।
देवी लक्ष्मीचे इतर काही मंत्र :
ॐ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नम:।।
ॐ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:।।
पद्मानने पद्म पद्माक्ष्मी पद्म संभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ।।
ऊं ह्रीं त्रिं हुं फट।।
शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या या मंत्राचा जप केल्यास देवीची कृपा आपल्यावर कायम राहतो. या मंत्रांनी देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. या मंत्राचा जप केल्याने जीवनात सुख, संपत्ती, वैभव आणि समृद्धी येते. जर तुम्हाला तुमच्या जीवनात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल, आर्थिक संकटं दूर करायचे असतील, तर दररोज पूजा केल्यानंतर या मंत्रांचा जप करावा.
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Vivah Panchami 2021 Date | विवाह पंचमी म्हणजे काय? जाणून घ्या पूजा आणि विधी
आयुष्यात यश मिळवाचयं ? देवी लक्ष्मीला प्रसन्न कराचंय? मग अन्न खाताना काही नियम लक्षात ठेवा