Ganesh Chaturthi 2021 : मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सव अवघ्या दोन दिवसांवर आलाय. गणेश चतुर्थी यावर्षी 10 सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. या दिवसापासून सुरु होणारा गणेश महोत्सव दहा दिवस चालणार असून 21 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन असेल. या दिवसांमध्ये गणपतीला प्रसन्न करण्यासाठी गणेश भक्त घरात, मंदिरांमध्ये आणि विविध मंडळांमध्ये गणेशाची पूजा करतात. त्यांना शेंदूर, दुर्वा, नैवेद्य अर्पण करतात. त्यांची आरती गातात.
गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या काही प्रसिद्ध आरती आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहेत.
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मन कामनांपुरती॥ जय देव…रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा।
हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया॥ जय देव…लंबोदर पीतांबर फणीवर बंधना।
सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना।
दास रामाचा वाट पाहे सदना।
संकष्टी पावावें, निर्वाणी रक्षावे,
सुरवरवंदना॥ जय देव…
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती पिता महादेवा
एकदन्त दयावन्त चारभुजाधारी
माथे पर तिलक सोहे, मूसे की सवारी
पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा
लड्डुअन का भोग लगे सन्त करे सेवा
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती पिता महादेवा ||अँधे को आँख देत कोढ़िन को काया
बाँझन को पुत्र देत निर्धन को माया
सूर श्याम शरण आए सफल कीजे सेवा
माता जाकी पार्वती पिता महादेवा
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती पिता महादेवा ||जय गणेश जय गणेश जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती पिता महादेवा
माता जाकी पार्वती पिता महादेवा
माता जाकी पार्वती पिता महादेवा ||
शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको।
महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी।
कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥भावभगत से कोई शरणागत आवे।
संतती संपती सबही भरपूर पावे।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे।
गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥
Ganesh Chaturthi 2021 | श्रीगणेशाच्या आगमनावेळी अक्षतांचा वापर का केला जातो? जाणून घ्याhttps://t.co/DOsZqi6RHm#GaneshChaturthi #GaneshaFestival #Ganeshotsav
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2021
संबंधित बातम्या :
Ganesh Chaturthi 2021 : पूजा विधी, व्रत विधी, मंत्र आणि बरेच काही जाणून घ्या या विशेष सणाबद्दल
Ganesh Chaturthi 2021 : गणपतीला का प्रिय आहे मोदक, जाणून घ्या काय आहे मान्यता !