मुंबई : गजानन गणपतीला समर्पित 10 दिवसांचा महापर्व गणेशोत्सव येणार आहे. हा सण शुक्रवार 10 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 19 सप्टेंबर रविवारी अनंत चतुर्थीपर्यंत सुरु राहील. दरवर्षी हा गणेशोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या उत्सवाबद्दल जास्तीत जास्त धूम असते. चतुर्थीच्या दिवशी गणपती भक्त ढोल-ताशांच्या गजरात आपल्या घरी घेऊन येतात.
यानंतर घरात गणपतीला घरात विराजमान केले जाते. श्रद्धेनुसार लोक 5, 7 किंवा 9 दिवस घरी गणपती बसवतात. या दरम्यान त्यांची खूप सेवा केली जाते. पूजा केली जाते आणि त्यांचे आवडते नैवेद्य अर्पण केले जातात. गणपतीच्या पूजेत अक्षतांचे विशेष महत्त्व आहे. ज्यावेळी गणेशाला घरी आणले जाते त्यावेळी एक विशेष पूजेचं आयोजन केले जाते. यादरम्यान, हळदी आणि कुंकू मिसळलेल्या अक्षतांनी गणपतीचे स्वागत केले जाते. तसेच, चतुर्थीच्या दिवशी दुपारची वेळ गणपतीच्या पूजेसाठी उत्तम मानली जाते. हे का केले जाते ते येथे जाणून घ्या –
गणपती हा सुखकर्ता मानला जातो आणि अक्षता हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की गणपतीच्या आगमनावेळी जर त्याला अक्षता म्हणजेच तांदूळ अर्पण केले गेले तर त्याने घरातील सर्व अडथळे दूर होतात आणि घरात शुभतेसह समृद्धी देखील येते. याशिवाय, असेही मानले जाते की अक्षता अर्पण केल्याने गणपतीसह सर्व देव-देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि घरात सकारात्मकता येते.
अक्षतांना कधीही पांढऱ्या अर्पण करु नये, म्हणून त्यात हळद किंवा कुंकु मिसळले जाते. यावेळी जर तुम्ही देखील तुमच्या घरात गणपती आणण्याची तयारी करत असाल तर हळद किंवा कुंकुमध्ये अक्षता मिसळून गणपतीचे स्वागत करा. तसेच, मिक्स करताना तांदुळ तुडणार नाही याची काळजी घ्या. कारण पूजेमध्ये नेहमी अख्ख्या अक्षतांचा वापर करावा .
गणेश चतुर्थीचा दिवस गणपतीची जयंती म्हणून साजरा केला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला दुपारच्या वेळी गणपतीचा जन्म झाल्याचे मानले जाते. साधारणपणे मंदिरामध्ये रात्री 12 नंतर पूजा केली जात नाही, परंतु गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारची वेळ ही गणपतीच्या पूजेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. चतुर्थीच्या दिवशी गणेशस्थापनेचा शुभ मुहूर्त दुपारी 12 वाजून 17 मिनिटांपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल. पण, तुम्ही फक्त दुपारी गणपतीची स्थापना करा आणि त्यांना दुर्वा, सुपारी, शेंदूर, अक्षता इत्यादी अर्पण करा. तसेच, त्याचे आवडते नैवेद्य बनवा. त्यानंतर त्यांची स्तुती करा.
Ganesh Chaturthi 2021 : गणपतीला का प्रिय आहे मोदक, जाणून घ्या काय आहे मान्यता !https://t.co/jMmVJooItb#GaneshChaturthi |#Modak |#Ganpati |#Favourite
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
गणेश चतुर्थीपूर्वी चोर गणपतीची प्रतिष्ठापना, सांगलीतील दोनशे वर्ष जुनी परंपरा