कोरोनाच्या संकटात लोकांना सगळ्यात मोठी उणीव भासली असेल कुठली तर ती आहे सणवार! या काळात सगळंच बंद होतं. गणेशोत्सव हा तर सार्वजनिक उत्सव कोविड काळात सगळ्याच सार्वजनिक गोष्टींवर बंदी आली होती. लोकं गणपतीच्या आगमनासाठी आतुर होते. या वर्षी बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव अतिशय उत्साहात पार पाडला जातोय. सोशल मीडियावर (Social Media) सुद्धा अगदी उत्साहाचं वातावरण आहे. लोकं गणपती बाप्पाचे (Ganpati Bappa Moraya) फोटो, व्हिडीओ शेअर करतायत. असाच एक कमालीचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात गजराज गणपती बाप्पांचं स्वागत करतायत आणि तेही गणपती बाप्पाच्या गळ्यात हार टाकून! स्वागत असावं तर असं मंडळी…
आज देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. यासोबतच गणेश उत्सवालाही सुरुवात झाली आहे. आता पुढचे दहा दिवस संपूर्ण वातावरण ‘गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया’ने गजबजून जाणार आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवाशी संबंधित व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियाच्या ‘दुनियेत’ ट्रेंड होऊ लागले आहेत. गणेश चतुर्थी उत्सवाच्या दरम्यान, इंटरनेटवर ‘गजराज’ च्या एका व्हिडिओने नेटिझन्सची मने जिंकली आहेत. व्हायरल क्लिपमध्ये एक हत्ती गणपतीच्या मूर्तीला आपल्या सोंडेने हार घालताना दिसत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गणपतीची एक भलीमोठी मूर्ती आहे. भाविकांचीही चांगलीच गर्दी असते. दरम्यान गणपतीच्या मूर्तीसमोर हत्ती घेऊन एक माहुत येतो. मग ‘गजराज’ विघ्नहर्ता गणेशाला त्याच्या सोंडेने हार घालतो. गणपतीच्या सगळ्या व्हायरल व्हिडीओमध्ये हा सगळ्यात भारी व्हिडीओ आहे. हत्तीने ज्या प्रकारे श्रीगणेशाचे स्वागत केले ते बघून नेटकरी तो व्हिडीओ प्रचंड प्रमाणात शेअर केलाय.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर giedde नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. युझरने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘गणेशजी आले आहेत.’ हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडलाय. काही तासांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 7500 पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे, तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडिओ जुना आहे. मात्र आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तो पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्यात. एका युझरने कमेंट केली की, “अतिशय आश्चर्यकारक दृश्य. त्याचवेळी आणखी एका युझरने कमेंट केली की, “गणपती बाप्पा मोरया. याशिवाय बहुतांश युजर्सनी हार्ट इमोजी टाकून रिअॅक्ट केलेलं आहे.