गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या निर्बंधामुळे गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा केला गेला. यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) निर्बंधमुक्त तर आहेच शिवाय काही विशेष योग (Special Yog) जुळून येत असल्याने अद्वितीयसुद्धा आहे. शास्त्रानुसार गणेशाला रिद्धी-सिद्धी आणि सुख-समृद्धी देणारे मानले जाते. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi 2022) म्हणतात. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा 31 ऑगस्टपासून सुरू होणारा गणेशोत्सव 9 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. गणेश चतुर्थीला प्रत्येक घरात गणपतीची स्थापना (Ganesh Sthapna) केली जाते. आज अनेक शुभ योगांमध्ये हा सण साजरा होणार आहे. यावेळी गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये अनेक विशेष योग घडत आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार या गणेश चतुर्थीला ते सर्व योग तयार होत आहेत जे श्री गणेशाच्या जन्माच्या वेळी तयार झाले होते. धार्मिक ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आढळतो. देवी पार्वतीने मातीपासून गणेश बनवला आणि त्यात प्राण ओतला, त्या वेळी बुधवार, चतुर्थी तिथी आणि चित्रा नक्षत्र होते. हे सर्व योग यावेळीही तयार होत आहेत. त्यामुळे हा सण आणखीनच खास बनला आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते यावेळी गुरूच्या स्थितीमुळे लंबोदर योगही तयार होत आहे. हे श्रीगणेशाचेच नाव आहे. या दिवशी वीणा, वरिष्ठ, उभयचारी आणि अमला असे 5 राजयोग देखील जुळून येत आहेत.
यावेळी बुधवार 31 ऑगस्ट ते शुक्रवार 9 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. या दरम्यान, नवमीतिथी पडल्यानंतरही गणेशोत्सव पूर्ण 10 दिवसांचा असेल. विशेष म्हणजे गणेशोत्सवात सूर्य सिंह राशीत, बुध कन्या राशीत, गुरु मीन राशीत आणि शनि मकर राशीत असेल. या चार राशींचे स्वामीग्रह हे त्यांच्याच राशीत राहणार आहे. गणेश चतुर्थीच्या काळात असा योगायोग गेल्या 300 वर्षांतही घडला नव्हता. यामुळे यंदाचा गणेशोत्सव दरवर्षीपेक्षा खास आहे.
आज बुधवार, 31 ऑगस्ट रोजी श्री गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. नवीन कामांच्या सुरुवातीसाठीही हा दिवस शुभ मानला जातो.
गुरुवार, 1 सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी व्रत केले जाणार आहे. मालमत्ता, वाहन, दागिने इत्यादी खरेदीसाठी हा दिवस शुभ आहे.
शुक्रवार, 2 सप्टेंबर रोजी स्कंद षष्ठीला भगवान कार्तिकेयची पूजा होईल. सर्व प्रकारच्या खरेदीसाठी हा दिवस शुभ राहील.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)