गणपती बाप्पाचं शनिवारी घरोघरी आगमन होणार आहे. पुढचे १० दिवस गणपती बाप्पांच्या मनोभावे सगळे पूजा करतील. या काळात गणपतीची आराधना केल्याने प्रत्येकाला भरपूर फायदे होतात. गणेशोत्सवादरम्यान तुम्ही काही वस्तू घरात आणल्या तर तुमच्या घरात सदैव सुख-समृद्धी नांदते. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही गणपती बाप्पा घरात विराजमान होण्याआधी खाली सांगितलेल्या वस्तू घरात आणल्या तर तुम्हाला कधीही पैशाची अडचण येणार नाही अशी मान्यता आहे. जाणून घेऊया अनंत चतुर्दशीपूर्वी कोणत्या वस्तू घरी आणाव्यात.
शंख
शंख हे लक्ष्मी देवीचे निवास आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीपूर्वी तुम्ही तुमच्या घरी शंख घेऊन यावे. गणपतीच्या आरतीनंतर दररोज शंख वाजवावा. असे केल्याने घरात सकारात्मकता राहते. याशिवाय मन सकारात्मक विचारांनी भरलेले राहते.
बासरी
घरात बासरी ठेवणे खूप शुभ मानले जाते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही चांदीची बासरी देखील ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. तुम्हाला तुमच्या घरात चांगले आरोग्य लाभेल.
कुबेर देवता
भगवान कुबेर यांना संपत्तीची देवता म्हटले जाते. कुबेराची मूर्ती घरात बसवल्याने धन आणि धान्याची कमतरता भासत नाही असे मानले जाते. तसेच गणपती आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात. याशिवाय घरातील गरिबीही दूर होते.
नाचणाऱ्या गणेशाची मूर्ती
अनंत चतुर्दशीपूर्वी घरामध्ये गणपतीची नृत्य करणारी मूर्ती स्थापित करावी. हे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उत्तर दिशेला लावावे. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. तसेच, नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही.
डिसक्लेमर – वरील दिलेली माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. याची कोणतीही पुष्टी टीव्ही ९ करत नाही. कोणतीही समस्या असली तर कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.