Watch LIVE Ganpati Visarjan 2023 in Maharashtra : तुमच्या शहरातील गणपती मिरवणूक पाहा टीव्ही 9 मराठीवर…; बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची लाईव्ह दृश्ये
Watch LIVE Ganpati Visarjan 2023 lalbaugcha raja Mumbai Maharashtra : ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तुमच्या शहरातील गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक तुम्हाला टीव्ही 9 मराठीवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज दिवसभर टीव्ही 9 मराठी पाहायला विसरू नका. तसंच गणपती विसर्जनाचे सर्व अपडेट्स आमच्या वेबसाईटवर वाचा...
मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : मागचे दहा दिवस राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतेय. सगळीकडे भक्तिमय वातावरण होतं. घराघरात लगबग पाहायला मिळत होती. सार्वजनिक मंडळांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. लोकांमध्ये उत्साह होता. तोच उत्साह आज देखील पाहायला मिळतोय. आज आपल्या लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीत लोक उत्साहात सहभागी झालेत. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक निघाली आहे. मुंबईच्या राजाच्या मिरणुकीला सुरुवात झाली आहे. तर पुण्यात पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मानाच्या गणपतीची आरती केली. त्यानंतर आता मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. त्यासह नाशिक, कोल्हापूर आणि नागपूर या शहरांमध्ये गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात झालीय. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही गणपतीची मिरवणूक सुरु झाली आहे.