मुंबई : बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान याचे चित्रपट एका मागून एक असे प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. विशेष म्हणजे सध्या शाहरुख खान हा सोशल मीडियावर (Social media) चांगलाच सक्रिय दिसतोय. शाहरुख खान याने काही दिवसांपूर्वीच आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले. या सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसला. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करतोय.
विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या जवान हा चित्रपटाची हवा फक्त भारतामध्येच नव्हे तर विदेशात देखील बघायला मिळतंय. जवान चित्रपटाने ओपनिंग डेलाच मोठा धमाका केला. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या याच चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. जवाननंतर लगेचच शाहरुख खान याचा डंकी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
जवान चित्रपट कमाईमध्ये धमाका करत असल्याने शाहरुख खान हा सध्या खूप जास्त आनंदी दिसतोय. शाहरुख खान हा मन्नत बंगल्याच्या गॅलरीमध्ये आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी आला. यावेळी शाहरुख खान याला पाहून चाहते हे मोठ्या प्रमाणात गोंधळ करताना दिसले. शाहरुख खान याला पाहून लोक फोटो आणि व्हिडीओ घेताना देखील व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
Our JAWAN greeting his loved ones and celebrating #GaneshChaturthi at Ambani’s house ❤️#JawanCreatesHistory #ShahRukhKhan pic.twitter.com/n4skSvB65a
— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) September 20, 2023
अंबानी कुटुंबाकडून नुकताच गणेश चतुर्थीनिमित्त भव्य पार्टी आयोजित करण्यात आले. या पार्टीला बाॅलिवूडच्या जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीला शाहरुख खान हा देखील सहकुटुंब उपस्थित होता. सर्वात अगोदर व्हिडीओमध्ये नीता अंबानी यांना शाहरुख खान भेटल्याचे दिसत आहे. यावेळी शाहरुख खान याची लेक सुहाना देखील दिसत आहे.
व्हिडीओमध्ये पुढे शाहरुख खान हा गणपती बाप्पाची पूजा करून दर्शन घेताना देखील दिसत आहे. लोकांना आता शाहरुख खान याचा हा व्हिडीओ प्रचंड आवडल्याचे दिसतंय. व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेत आहे. शाहरुख खान याच्या या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
एका चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, सर्वच धर्मांचा सन्मान करणे खूप जास्त महत्वाचे आहे आणि ही गोष्ट शाहरुख खान याच्याकडून शिकण्यासारखी नक्कीच आहे. दुसऱ्याने लिहिले की, शाहरुख खान यामुळेच बाॅलिवूडवर इतकी वर्षे राज करतोय. जवळपास सर्वचजण शाहरुख खान याच्या या व्हिडीओवर कमेंट करून त्याचे काैतुक करत आहेत.