मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही शिल्पा शेट्टी ही कायमच जोरदार चर्चेत असते. शिल्पा शेट्टी ही आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर करते. शिल्पा शेट्टी ही आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. शिल्पा शेट्टी ही चाहत्यांसाठी नेहमीच योगा किंवा डाएटचे फोटो शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच एक चर्चा होती की, शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर एक चित्रपट तयार होणार आहे.
याबद्दल काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी हिला विचारण्यात आले. त्यावेळी शिल्पा शेट्टी थेट म्हणाली की, मी यावर आताच काही भाष्य करणे उचित ठरणार नाही. शिल्पा शेट्टी हिच्या घरी विराजमान करण्यात आलेले गणपती बाप्पा आज निरोप घेत आहेत. शिल्पा शेट्टी संपूर्ण कुटुंबासह बाप्पाच्या विसर्जनमध्ये सहभागी झालीये. शिल्पा शेट्टी हिच्यासोबत यावेळी पती राज कुंद्रा दिसत आहे.
बाप्पाच्या विसर्जनासाठी नाशिकचा ढोल ताशांचा दणदणाट झाला आहे. नाशिक ढोलच्या तालावर नाच-गाणी करत बाप्पाला निरोप दिला जात आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी सोसायटीमध्ये ड्रम ठेवण्यात आला आहे आणि या ड्रममध्ये बाप्पाचे विसर्जन केले जाईल. दरवर्षी शिल्पा शेट्टी आपल्या संपूर्ण कुटुंबासह बाप्पाच्या विसर्जनाला हजेरी लावते आणि यावर्षीही शिल्पा आपल्या कुटुंबासह बाप्पाला निरोप देत आहे.
शिल्पा शेट्टी ही देखील यावेळी डान्स करताना दिसत आहे. शिल्पा शेट्टी हिच्यासह राज कुंद्रा यानेही डान्स केला. शिल्पा शेट्टी हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शिल्पा शेट्टी ही अत्यंत मोठे खुलासे करताना दिसली. शिल्पा शेट्टी हिने अनेक वर्षांनंतर आपल्या मनातील खदखद व्यक्त करत मोठे खुलासा केला. शिल्पा शेट्टी हिने बाॅलिवूडवर काही मोठे आरोप देखील केले.
शिल्पा शेट्टी म्हणाली की, माझा कधीच बाॅलिवूडच्या टाॅप 10 अभिनेत्रींमध्ये समावेश करण्यात नाही आला. माझे अनेक चित्रपट हिट ठरले. मात्र, हे कोणाकडे म्हणणार ना. आता तर तेही सांगण्यासाठी कोणीच नाहीये. पुढे शिल्पा शेट्टी म्हणाली, मी नेहमीच माझ्याकडे जे काही आहे, त्यावर काम करते. मी दुसरी अपेक्षा नाही करत. माझ्याकडे ज्या चित्रपटांच्या आॅफर आहेत, त्यामध्ये कसे बेस्ट देताना येईल हा विचार मी करते.