मुंबई- राज्यात गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येतोय. कोरोनाच्या दोन वर्षांत असलेल्या बंदीनंतर यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav)धामधुमीत साजरा करण्यात य़ेणार आहे. मुंबईसह (Mumbai)कोकणात आणि राज्यभरात पुढचे 10 दिवस गणेशोत्सवाचा आनंद घराघरात पाहायला मिळणार आहे. प्रत्येक गल्लीत असलेल्या सार्वजनिक मंडळातही हा उत्साह दिसेल. या मंडपांवर त्यातील रोषणाई आणि डेकोरेशन (decoration), चलत चित्रांवरही कोट्यवधी रुपयांचा खर्च दरवर्षी केला जोता. त्याचमुळे यंदा अनेक गणेश मंडळांनी त्यांच्या मंडपांचा विमा काढल्याची माहिती आहे. यावर्षी गणेश मंडळांनी कोट्यवधी रुपयांचा विमा उतरवलेला आहे.
मुंबईत 12 हजार सार्वजनिक मंडळे आहेत. तर घरात स्थापना होणाऱ्या गणेशांची संख्या तर लाखांच्या घरात आहे. मुंबईत किंग सर्कलचा जीएसबी सेवा मंडळाचा गणपती हा श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार या गणपतीला यावर्षी 70 किलो सोने आणि 300 किलो चांदीच्या दागिन्यांचा शृंगार करण्यात येणार आहे. या गणएश मंडळाने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून 316.40 कोटी रुपयांचा विमा उतरवला असल्याची माहिती आहे.
मुंबईच्या किंग सर्कलच्या जीएसबी सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय कामत यांमी सांगितले की, गणेशोत्सवासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपीनकडून मंडळाने विमा घेतला आहे. येणाऱ्या सगळ्या भक्तांचाही विमा काढण्यात येणार आहे. यात 31.97 कोटी रुपयांचा विमा सोन्याच्या आणि चांदींच्या दागिन्यांचा आहे. तर 263 कोटी रुपयांचा विमा हा सुरक्षारक्षक, पुजारी, स्वयंसेवकांसाठी काढण्यात आलेला आहे.
जीएसबी सेवा मंडळाने भूकंपाचा धोका कव्हर करण्यासाठी, तसेच फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, भांडी, किराणा, फळे, भाज्या या सामानांचाही विमा करण्यात आलेला आहे. मंडप आणि भक्तांसाठी 20कोटी रुपयांचा विमा कव्हर घेण्यात आला आहे.