मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आहे. हा सण रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत असेल राहील. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी दुपारी गणपतीचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात आणि सकाळी, संध्याकाळी त्यांची विशेष पूजा करतात. श्रीगणेश दीड, 5, 7 किंवा 9 दिवस घरात विराजमान असतात. त्यानंतर त्यांचे विसर्जन केले जाते. आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.
या 10 दिवसांमध्ये गणपतीला त्यांचे आवडते मोदक, लाडवांचं नैवेद्य अर्पण केले जाते. असे म्हटले जाते की गणपती दुःख दूर करणारा आणि सुख देणारा आहे. अशा स्थितीत जो कोणी या काळात प्रामाणिक अंतःकरणाने गणपतीची पूजा करतो, त्याला निश्चितच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याच्या दुःखाचा अंत होतो.
सकाळी – 12.20 ते 01.55 मिनिटे
दुपारी – 03.31 ते 5.06 मिनिटे
संध्याकाळी – 08.6 ते 09.31 मिनिटे
रात्री – 10.56 ते 3.10 (मध्यरात्री, 04 सप्टेंबर)
यावर्षी अन्नत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीला निरोप दिला जातो. या वर्षी चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरु होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत असेल. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्तही जाणून घ्या-
सकाळचा मुहूर्त – 7:39 ते 12:14 पर्यंत
दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत
संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46
रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)
सकाळचा मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)
सोलापूर – दीड दिवसाचा गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेला मजूर गेला वाहून
मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील आष्टी बंधाऱ्यात गेला वाहून
आपल्या सहकाऱ्यांसमवेत गेला होता दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी
वडवळच्या रेल्वे स्लीपर कारखान्यात करत होता काम
कोळेगाव येथील कोळी बांधव आणि पोलीस प्रशासन घेत आहेत शोध
वसई-विरार-नालासोपाऱ्यात दीड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात
वसईच्या माणिकपूर पोलिसांनी आपल्या पोलिसी रितिरिवाजाने गणरायाला सशस्त्रधारी सलामी देऊन, विसर्जनासाठी घेऊन गेले
पोलीस ठाण्यातील बाप्पाच्या विसर्जनानंतर पोलीस पुन्हा आपल्या विसर्जन स्थळावर बंदोबस्तासाठी तैनात होणार आहेत
– मुंबईत आज दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन
– यंदा मैदानात विसर्जनासाठी कृत्रीम तलावाची निर्मिती
– विसर्जनासाठी सकाळपासूनच भव्य स्टेज आणि जंतू नाशकाची फवारणी सुरु
– पवई तलावाचा लोड कमी करण्यासाठी यंदा आसपासच्या परिसरात मैदानातच कृत्रीम तलावांची मनपाकडून निर्मिती…
दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप, ठाण्यात मोठा बंदोबस्त; भक्तांना अँटिजेन टेस्ट बंधनकारकhttps://t.co/wwCiNsmmfr#GaneshChaturthi | #GaneshChaturthi2021 | #Ganeshotsav | #idolimmersion | #thane
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 11, 2021
आज होणाऱ्या दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी पुणे पालिकेची तयारी पूर्ण
दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी शहरात १९० फिरते हौद असणार
तर २४७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आलीये
नागरिकांनी घरच्या घरी विसर्जन करावे यासाठी सुमारे १९० मेट्रीक टन अमोनिअम बायकार्बोनेटचे वितरण ही महापालिकेने केलयं