मुंबई : प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आहे. हा सण रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत असेल राहील. दरवर्षी गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी लोक गणपतीची मूर्ती आपापल्या घरी आणतात आणि त्यांची स्थापना करतात. त्यानंतर गणपतीला आपल्या परंपरेनुसार दीड, 5, 7 किंवा 9 दिवस घरी बसवल्यानंतर त्याचे विसर्जन केले जाते.
मान्यता आहे की जर तुम्ही मनापासून गणपतीची उपासना केली तर तो सर्व त्रास दूर करतो आणि तुमच्याबरोबर घेऊन जातो. जर तुमच्या आयुष्यातही मोठे संकट असेल, तुमच्या कामात अडथळे येत असतील, तर गणेश चतुर्थीच्या दिवशी निश्चितपणे संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा. येथे जाणून घ्या संकटनाशक गणेश स्तोत्र पठणाचे फायदे आणि संकटनाशक गणेश स्तोत्र.
ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांच्या मते गणपतीचे हे स्तोत्र अतिशय सिद्ध स्तोत्र आहे. गणेशोत्सव हा गणपतीचा विशेष पूजेचा दिवस असल्याने या स्तोत्राचे पठण सुरु करणे खूप फायद्याचे असू शकते. जर तुम्ही गणेशोत्सवाच्या दिवसापासून त्याची सुरुवात केली आणि सलग 40 दिवस पूर्ण भक्तिभावाने त्याचे पठण केले तर सर्वात मोठे त्रासही टळतील. पूजेच्या वेळी दुर्वा देवासमोर समर्पित करा. परंतु नेहमी लक्षात ठेवा की कोणत्याही कार्याच्या सिद्धीसाठी मनात विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. विश्वासाशिवाय काहीही होऊ शकत नाही. जर तुम्ही रोज त्याचे पठण केलेत, तर तुम्हाला अधिक लाभ मिळतील कारण गणपती सुखकर्ता आणि दुखहर्ता आहे. त्यांची नियमित पूजा केल्याने ते सर्व त्रास दूर करतात आणि व्यक्तीचे जीवन आनंदी करतात.
प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम्,
भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये.
प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम्,
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम्.
लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च,
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम्.
नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम्,
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन्.
द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः,
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो.
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्,
पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम्.
जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते,
संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः.
अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते,
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः
Ganesh Chaturthi 2021 : गणपती बाप्पाची पूजा करताना ‘ही’ आरती नक्की म्हणाhttps://t.co/ycLeblxp0i#GaneshChaturthi2021 #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 10, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Ganeshotsav 2021 | आज दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन, जाणून घ्या शुभ मुहूर्त
Ganesh Chaturthi 2021 | गणपतीसमोर या मंत्रांचा जप करा, मनातील सर्व मनोकामना होतील पूर्ण