गरूड पूराण
Image Credit source: Social Media
मुंबई, 18 महापुराणांमध्ये गरुड पुराण (Garud Puran) अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, गरुड पुराणाचा ग्रंथ एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वाचला जातो, पण या व्यतिरिक्त पुराणात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्यांचा संबंध मनुष्याच्या दैनंदिन जीवनाशी आहे. गरुड पुराणानुसार, व्यक्तीने आपल्या काही वाईट सवयी सोडल्या पाहिजेत अन्यथा त्याला आयुष्यात केवळ नकारात्मकच परिणाम मिळतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 सवयी ज्या माणसाने सोडणे आवश्यक आहे.
या सवयी माणसाने तत्काळ सोडाव्या
- गरुड पुराणानुसार, जे गरीब आणि दुर्बल लोकांवर अत्याचार करतात किंवा त्यांचे शोषण करतात, तो व्यक्ती जीवनात कधीही सुखी होऊ शकत नाही. गरुड पुराणानुसार जे लोकं इतरांचे शोषण करून पैसा कमावतात त्यांची सर्व संपत्ती लवकर नष्ट होते.
- गरुड पुराणात म्हटले आहे की, घरात कधीही घाण असू नये. ज्या घरात घाण असते तिथे लक्ष्मी कधीच येत नाही असे म्हणतात. म्हणूनच घर स्वच्छ ठेवावे. याशिवाय माणसाने आपले कपडेदेखिल स्वच्छ ठेवावेत.
- गरुड पुराणानुसार लोभ फार वाईट आहे. लोभ माणसाचे जीवन पूर्णपणे नष्ट करू शकतो. लोभ माणसाला इतका वाईट बनवतो की, चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्यासाठी माणूस प्राेत्साहीत होतो.
- गरुड पुराणानुसार माणूस जितका लोभी असेल तितकी देवी लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाते.
गरुड पुराणानुसार, माणसाने आयुष्यात कितीही यश मिळवले तरी कधीही अहंकारी होऊ नये. अहंकार माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि अशा लोकांकडे पैसा कधीच थांबत नाही.
- गरुड पुराणानुसार पाय ओढणारे जीवनात कधीही आर्थिक प्रगती करू शकत नाहीत. असे मानले जाते की, जे लोक पाय ओढतात त्यांचा वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो. अशा व्यक्तींना पराकोटीचाही सामना करावा लागतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)