मुंबई : जगात क्वचितच अशी कोणती व्यक्ती असेल ज्याला पैशांची गरज नाही. प्रत्येक व्यक्ती जो सकाळपासून रात्रीपर्यंत कठोर परिश्रम करतो त्याची इच्छा असते त्याने अमाप संपत्ती कमवावी आणि देवी लक्ष्मी नेहमी त्याच्यावर प्रसन्न राहावी. पण सत्य हे आहे की केवळ इच्छेने संपत्तीचा खजिना भरत नाही. यासाठी कठोर परिश्रमाबरोबरच सौभाग्याचीही गरज असते, जी फक्त देवी लक्ष्मीच्या कृपेने मिळते. आज आपण जाणून घेऊया की ते कोणते शाश्वत उपाय आहेत ज्याद्वारे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या भक्तांवर ती कृपा करते.
1. संपत्तीच्या देवीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात पहिली अट म्हणजे आपले घर आणि कार्यस्थळ नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवा.
२. देवी लक्ष्मीची कृपा हवी असल्यास स्वयंपाकघरात कधीही घाणेरडी भांडी ठेवू नका.
3. रोज सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याच्या कलशात पाणी घेऊन ते शिंपडा. जर घरातील स्त्रीने हा उपाय केला तर तो अधिक शुभ होतो.
4. घरात दररोज देवी लक्ष्मीची पूजा करा आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावा.
5. देवी लक्ष्मीचे आशीर्वाद राहण्यासाठी चुकूनही रात्री तांदूळ, दह्याचं सेवन करु नका.
6. घरात विधीवत पद्धतीने महालक्ष्मी यंत्राची स्थापना करा आणि दररोज भक्तीभावाने त्याची पूजा करा.
7. घरातील पैशांच्या ठिकाणी किंवा पर्सला कधीही उश्ट्या हाताने स्पर्श करु नका आणि थुंकी लावून पैसे मोजू नका.
8. घराच्या पूजेच्या ठिकाणी देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्रासोबत शंख ठेवा. हे लक्षात घेण्यासारखे आहे की शंख समुद्र मंथनाच्या वेळी प्राप्त झालेल्या 14 मौल्यवान रत्नांपैकी एक आहे. ज्याला लक्ष्मीजींचा भाऊ मानले जाते.
9. पिवळ्या कौडी या लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते, म्हणून देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी काही पांढऱ्या कौडींना केशर किंवा हळदीच्या द्रव्यात भिजवा आणि त्यांना लाल कपड्यात बांधून ठेवा आणि जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. या ठिकाणी श्रीफळ म्हणजेच नारळाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते.
10. श्री यंत्राची पूजा करुन आणि श्री सूक्ताचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा फार लवकर प्राप्त होते.
Shardiya Navratri 2021 | शारदीय नवरात्र कधीपासून, जाणून घ्या कलश स्थापनेचा शुभ मुहूर्तhttps://t.co/5drDB4sdrZ#ShardiyaNavratri2021 #Navratri #GoddessDurga
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 22, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Garuda Purana : या 5 सवयी एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून रोखतात, आजच करा गुडबाय
Kalash remedies : कलशचाही आहे तुमच्या नशिबाशी संबंध, जाणून घ्या त्यासंबंधित खात्रीशीर उपाय