लखनऊ : मथुरा आणि वृंदावनचं नाव ऐकताच लोकांच्या मनामध्ये भगवान कृष्ण आणि राधाराणीची (Gopeshwar Mahadev Temple In Vrindavan Mathura) आठवण होते. पण आज आम्ही तुम्हाला वृंदावनच्या एका अशा मंदिराबाबत अशा एका मंदिराबाबत सांगणार आहोत जे श्रीकृष्णाचं नाही तर महादेवाचं आहे. या मंदिरात महादेव कृष्णाच्या गोपीकेच्या रुपात विराजमान आहेत आणि त्यांचा महिलाप्रमाणे श्रुंगार केला जातो (Gopeshwar Mahadev Temple In Vrindavan Mathura).
हे जगातलं एकमेव असं मंदिर आहे जिथे महादेव महिलेच्या स्वरुपात विराजमान आहेत. देशातील कानाकोपऱ्यातीन भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. यांना ‘गोपेश्वर महादेव’च्या नावाने ओळखलं जातं. गोपेश्वर महादेव मंदिर वृंदावनच्या सर्वात जुन्या मंदिरापैकी एक असल्याचं मानलं जातं. मान्यतेनुसार, येथील शिवलिंगची स्थापना भगवान श्री कृष्ण यांचे नातू वज्रनाभ यांनी केली होती. जाणून घ्या गोपेश्वर महादेव या मंदिराची पौराणिक कथा.
पौराणिक कथेनुसार, द्वापारयुगात एकदा भगवान श्रीकृष्णाने ब्रजच्या गोपिकांसोबतच महारास केला होता. या मनोहर दृश्याचा साक्षी प्रत्येक देवी-देवतांना व्हायचं होतं. महादेव जे भगवान विष्णूंना आपलं आराध्य दैवत मानतात, ते त्यांचा महारास पाहाण्यासाठी पृथ्वी लोकवर आले. मात्र त्यांना गोपिकांमध्ये सहभागी होऊ दिलं नाही.
या महारासमध्ये फक्त महिला सहभागी होऊ शकतात, असं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर माता पार्वतीने त्यांना
इसके बाद माता पार्वती यांनी महादेवाला सल्ला दिला की ते गोपिकेच्या रुपात महारासमध्ये सहभागी व्हावं. त्यासाठी यमुनेची मदत घ्यावी. यमुनाने महादेवांच्या आग्रहावर त्यांचा गोपिकेच्या रुपात श्रुंगार केला. त्यानंतर महादेव गोपिकेच्या रुपात महारासमध्ये सहभागी झाले.
पण, या रुपातही कृष्ण भगवानने त्यांना ओळखलं आणि महारासनंतर स्वत: आपल्या आराध्य महादेवाची पूजा केली. त्यांनी याच रुपात ब्रजमध्ये राहण्याचा आग्रह केला. तेव्हा राधेने सांगितंल की महादेवाचे गोपिकेच्या रुपात गोपेश्वर महादेवाच्या नावाने ओळखलं जाईल. तेव्हापासून ते आतापर्यंत गोपेश्वर महादेवाच्या मंदिरात त्यांचा महिले प्रमाणे श्रुंगार केला जातो. त्यानंतरच त्यांची पूजा अर्चना केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते.
Kaal Bhairav | कोण आहेत काळ भैरव? ज्यांच्या उपासनेने दूर होतात मोठी विघ्ने, जाणून घ्या…#KaalBhairav | #devotional | #Spritual https://t.co/ZCSir6jyOA
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 26, 2021
Gopeshwar Mahadev Temple In Vrindavan Mathura
संबंधित बातम्या :
Pradosh Vrat | आनंद, सौभाग्य आणि समृद्धी देणारा बुध प्रदोष, जाणून घ्या ‘या’ व्रताची कथा…
Chaitra Navratri 2021 | चैत्र नवरात्रीचा शुभारंभ कधी? कलश स्थापनेचा विधी काय?
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दानधर्म करा, साडेसातीची पीडा निवारण्याचे ज्योतिषशास्त्रात उपाय काय?