Gudipadwa 2023 : कधी आहे गुडी पाडवा? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्व

| Updated on: Mar 03, 2023 | 5:25 PM

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन गोष्टी सुरु करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो.

Gudipadwa 2023 : कधी आहे गुडी पाडवा? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्व
गुडीपीडवा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्माचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून (Gudipadwa 2023) सुरू होते. महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो. तथापि, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये हा दिवस उगादी किंवा युगादी म्हणून साजरा केला जातो. तर सिंधी हिंदू हा दिवस चेट्टी चंदच्या नावाने साजरा करतात. नवरात्रीची सुरुवातही याच दिवशी होते. त्याचबरोबर शेतकरी पिकांची पेरणीही करतात. या दिवशी सूर्योदयापासूनच पूजा सुरू होते. गुढीपाडव्याची तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व याविषयी आवश्यक माहिती जाणून घेऊया.

हिंदू कॅलेंडरनुसार, गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी ही तारीख 22 मार्च, बुधवारी असेल. 22 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. दुसरीकडे, पूजा मुहूर्ताबद्दल बोलायचे तर, गुढीपाडव्याच्या पूजेचा शुभ मुहूर्त 22 मार्च रोजी सकाळी 6.29 ते 7.39 पर्यंत असणार आहे.

हे सुद्धा वाचा

गुढीपाडव्याचे महत्त्व

  • या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती आणि हा दिवस ब्रह्मपूजेसाठी समर्पित मानला जातो.
  • या दिवसापासून नवरात्रीची सुरुवात होते आणि प्रत्येक घरात माता दुर्गेची पुजा केली जाते.
  • या दिवशी शेतकरी नवीन पिके घेतात.
  • या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोरांवर विजय मिळवला होता. विजयाच्या आनंदात शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने ‘गुड्डी’ उभारली.

गुढी कशी उभारावी 

  1. गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात.
  2. काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते.
  3. ज्या भागाला गुढी उभारायची आहे, तिथली जागा स्वच्छ करुन धुऊन पुसून घ्यावी.
  4. त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवावी.
  5. तयार केली गुढी दारात, गच्चीवर, गॅलरीत लावावी.
  6. गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करावी.
  7. निरंजन लावून उदबत्ती ओवाळावी.
  8. दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवावं.
  9. दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवावे.
  10. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरवावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)