भारतीय मुस्लिम दोन वर्षांनंतर हज यात्रेला (Hajj yatra 2022) जात आहेत. 2020 आणि 2021 मध्ये सौदी अरेबियाने कोरोनामुळे परदेशी यात्रेकरूंना हज यात्रा (Hajj Yatra) करण्यास बंदी घातली होती. मात्र यावेळी सौदी सरकारने (Saudi Government) काही अटींसह परदेशी प्रवाशांना परवानगी दिली आहे. हज यात्रा करणे हे प्रत्येक मुस्लिमांचे स्वप्न असते. हज कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हज यात्रेला जाण्यासाठी यात्रेकरूंना नोंदणी करावी लागते (Hajj registration) आणि त्यानंतर त्यांना शॉर्टलिस्ट केले जाते. हज यात्रेला जाण्यासाठीही काही मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines For Hajj Yatra) आहेत. इस्लामिक कॅलेंडरचा 12वा महिना हिज्जाहच्या 8 व्या ते 12 व्या दिवसापर्यंत हज होतो. ईद-उल-अजहा म्हणजे बकरीदच्या दिवशी हज पूर्ण होतो. हज व्यतिरिक्त, मुस्लिमांमध्ये आणखी एक तीर्थयात्रा आहे, ज्याला उमराह म्हणतात. मात्र उमराह वर्षभरात कधीही करता येणे शक्य आहे.
हज यात्रा ही खूप खर्चिक असते. हज यात्रेला कमीतकमी पाच लाखांचा खर्च येतो. तथापि, 2022 चा प्रवास पूर्वीच्या तुलनेत 1.25 लाख रुपयांनी महाग झाला आहे. याशिवाय टूर कंपनीसोबत गेल्यास खर्च आणखी वाढतो. हज कमेटी ऑफ इंडियाकडून यात्रेकरूंना विमान तिकिटांवर 25% सवलत देण्यात येत होती, पण 2018 नंतर ही सवलत बंद करण्यात आली. आता ही रक्कम मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही. अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)