Hartalika Vrat 2022:आज हरतालिका आहे. गणेश चतुर्थींच्या (Ganesh Chaturthi 2022) आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयाला हरतालिका व्रत करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रसोबत भारतात महिला मोठ्या उत्साहाने हे व्रत करतात.हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत आणि पूजा करतात. याशिवाय विवाह इच्छुक मुली चांगल्या वराच्या प्राप्तीसाठीसुद्धा हे व्रत ठेवतात. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विवाहित महिलांसाठी विशेष महत्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. हरतालिका व्रत (Hartalika vrat) अविवाहित आणि विवाहित स्त्रिया दोघेही ठेऊ शकतात. वट सावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत निर्जल ठेवले जाते. पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती यांनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. हरतालिका व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळते अशीही मान्यता आहे. याशिवाय वैवाहिक जीवनात काही समस्या येत असल्यास हे व्रत करण्याचा सल्ला देण्यात येतो.
घर स्वच्छ करून नित्य कर्म आटोपावी देवघराजवळ चौरंग ठेवावा. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा कवावी. धूप-दीप, नैवेद्य दाखवावा. या दिवशी वनामध्ये असणाऱ्या वेली, फुलं यांच्या पत्री घेऊन त्या अर्पण कराव्यात. हिंदू धर्मात सर्व सणांचा संबंध निसर्गाशी जोडलेला आहे. त्यांचं जतन व्हावं आणि ही पूजा संपन्न व्हावी यासाठी त्या पत्रींना महत्त्व आहे. हे व्रत अनेक वर्ष स्त्रिया करत आलेल्या आहेत. वैवाहिक जीवनात समस्या असल्यास स्त्रियांनी हे व्रत अवश्य करण्याचा सल्ला देण्यात येतो. इच्छुक वर प्राप्तीसाठी अविवाहित स्त्रिया देखील हे व्रत करातात.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत पाळले जाते. विवाहित स्त्रिया हरितालिका व्रत करतात. यावर्षी हे व्रत 30 ऑगस्ट 2022 ला आलेले आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 29 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:20 ते 30 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:33 पर्यंत असेल. 30 ऑगस्टला सकाळी 06:05 ते 08:38 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)