न्यू जर्सी : महंत स्वामी महाराज यांनी 30 सप्टेंबरला शनिवारी अमेरिकेच्या न्यू जर्सीमधील रॉबिंसविले येथे बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधाम उद्घाटन समारंभाच्या सीरीजचा शुभारंभ केला. या कार्यक्रमात भगवान स्वामीनारायण यांचे बालपणीचे नाव श्री नीलकंठ वर्णीची अभिषेक मूर्तीची जल्लोषात प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. ‘सेलिब्रेटिंग सनातन धर्म’ कार्यक्रमात 400 हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या. महंत स्वामी महाराज आल्यानंतर वरिष्ठ स्वामींनी अनुष्ठान आणि पूजा-अर्चना केली, ज्याला प्रसाद प्रवेश समारोह म्हटलं जातं. सामान्यपणे कुठल्याही नव्या परिसरात किंवा भवन प्रवेशाच्यावेळी प्रसाद प्रवेश समारोहच आयोजन केलं जातं. या पवित्र कार्यासाठी जगभरातील अनेक देशांसह भारताच्या अनेक भागातून 555 धार्मिक स्थळावरुन पवित्र माती आणि जल आणलं होतं. इथे येणाऱ्यांना भारतातील पवित्र स्थळांची पवित्रता तसेच निर्मळतेची जाणीव करुन देणं, हाच अक्षरधाममध्ये या गोष्टींचा समावेश करण्यामागे उद्देश आहे.
महंत स्वामी महाराजांकडून नीलकंठ वर्णी अभिषेक मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. मूर्ती प्रतिष्ठापना फक्त एक कार्यक्रम नव्हता. आध्यात्मिक यात्रेशी जोडल जाण्याची ही एक सुखद भावना होती. त्यानंतर संध्याकाळी प्रेरणादायी कार्यक्रमात “सेलिब्रेटिंग सनातन धर्म” आयोजन करण्यात आलं. हा कार्यक्रम याच समारंभाचा भाग होता. उत्तर अमेरिकेत सनातन धर्माच्या समृद्ध वारशाचा आंनदोत्सव साजरा करण्यासाठी, विचारांच आदान-प्रदान करण्यासाठी हिंदू मंदिरातून शेकडो सदस्य आणि ट्रस्टी सहभागी झाले होते. बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधामच्या 10 दिवसीय भव्य समर्पण समारंभाच समापन 8 ऑक्टोबरला होईल.
कार्यक्रमात कोण-कोण बोललं?
कार्यक्रमात हिंदू समुदायाकडून अनेक प्रतिष्ठित वक्ते, विद्वान आणि विचारकांनी आपले विचार मांडले. यात स्वामी गोविंददेव गिरि जी, स्वामी मुकुंदानंद जी, जेफरी आर्मस्ट्रांग (कवींद्र ऋषी), हिंदू यूनिवर्सिटी ऑफ अमेरिकेचे अध्यक्ष वेद नंदा, अमेरिकेच्या विश्व हिंदू परिषदेचे शिक्षा उपाध्यक्ष डॉ. जय बंसल आणि इंटरनॅशनल ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनचे प्रमुख डॉ. टोनी नादर सहभागी झाले होते. यावेळी सनातन धर्माशी संबंधित अनेक बाजूंवर त्यांनी आपली मते मांडली.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार काय म्हणाले?
मुख्य अतिथि म्हणून श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार पूज्य स्वामी गोविंददेव गिरि उपस्थित होते. ते म्हणाले की, “मी बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधाममध्ये अनेक दिवस राहिलोय. मला असं वाटत की, अशा ठिकाणी येऊन तुम्ही हिंदू संस्कृतीबद्दल विस्तृत दृष्टीकोन विकसित करु शकता. मंदिरातील पवित्र फोटो पाहून भारत आणि हिंदू धर्माबद्दल वेगळा दृष्टीकोन लक्षात येतो”