मुंबई : हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुच्या नियमांनुसार घरगुती वस्तू ठेवल्यास घरात सुख आणि शांती नांदते. वास्तुमध्ये सर्व काही सांगितले गेले आहे. आज आम्ही तुम्हाला घराच्या दरवाजांविषयी काही महत्वाची माहिती देणार आहोत (House Door Vastu Tips Make Doors According To vastu Will Bring Happiness And Peace ).
वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार जर घराचा दरवाजा त्या प्रकारे बनविला असेल तर घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. त्याबद्दल जाणून घेऊया –
एका पल्ल्याचा दरवाजा वास्तुमध्ये शुभ मानला जात नाही. दुहेरी पल्ल्याचे दरवाजे घरात सकारात्मकता आणतात. त्यामुळे शक्य असल्यास घराला दुहेरी पल्ल्याचे दरवाजे बसवा.
वास्तुच्या नियमांनुसार जेव्हा दरवाजा उघडला आणि बंद केला जातो तेव्हा त्याचा कधीही आवाज येऊ नये. जर तुमच्या दाराचा आवाज येत असेल तर तो सुधारा किंवा नवीन घ्या.
जर तुमच्या घराचा दरवाजा जमिनीवर घासला जात असेल, तर वास्तुनुसार त्याने तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होते.
वास्तुच्या नियमांनुसार तुमच्या घराचे दरवाजे खूप लांब किंवा खूप लहान नसावेत.
वास्तुनुसार दरवाजे आणि खिडक्या लाकडाच्या असाव्यात ज्यामध्ये वारा, पाणी आणि सूर्यप्रकाश सहन करण्याची क्षमता असते.
Mirror Vastu Tips : घरात आरसा लावताना वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करा, तुमचं नशीब उजळू शकतेhttps://t.co/wDx7csSnXo#Mirrors #VastuDosh #Vastushatra #VastuTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2021
House Door Vastu Tips Make Doors According To vastu Will Bring Happiness And Peace
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Vastu Tips | घरात हिरव्या रंगाचा वापर करा, सौभाग्य, विकास आणि आरोग्य लाभेल
Utensil Vastu Tips | स्वयंपाकघरात तुटलेली-फुटलेली भांडी असतील तर आजच बदला, अन्यथा नुकसान होणार