नवीन वर्षाच्या आधी घरात करा ‘हे’ बदल, दूर होतील वास्तुदोष!

| Updated on: Dec 06, 2024 | 2:05 PM

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरातील वस्तूंच्या देखभालीकडे विशेष लक्ष दिले तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो. अशावेळी घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण आपल्या घरात कोणते बदल करावेत हे जाणून घेऊया.

नवीन वर्षाच्या आधी घरात करा हे बदल, दूर होतील वास्तुदोष!
Follow us on

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तूनियमांनुसार घरात प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी ठेवणे बंधनकारक आहे. तुमच्या घरात वास्तुनियमांचे पालन न केल्यास तुम्हाला आर्थिक अडचणी आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा लोक वास्तु डोळ्यासमोर ठेवून आपलं घर बांधतात, पण घरातील वस्तू वास्तूनुसार ठेवत नाहीत, ज्यामुळे व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. जर तुम्हालाही वाटत असेल की येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या घरात धनाची देवी लक्ष्मीदेवीचा वास असेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळावा तर तुम्ही तुमच्या घरात काही बदल करावेत.

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरात काही बदल केले तर त्यामुळे तुमच्या घरात असलेली नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो. अशावेळी घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्या घरात कोणते बदल करावे लागतील हे जाणून घेऊया.

तिजोरीचे तोंड कुठे असावे?

हे सुद्धा वाचा

वास्तुनुसार तुम्ही तुमच्या घराची तिजोरी उत्तर किंवा ईशान्य दिशेलाच ठेवावी. उत्तर किंवा ईशान्य दिशा ही धनाची देवता कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मी यांची दिशा मानली जाते. अशावेळी या दिशेने तिजोरी सुरक्षित राहिल्यास तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

वास्तूनुसार घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात?

घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उगवणारा सूर्य किंवा नद्या अशी निसर्गाशी संबंधित फोटो घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावावीत. त्याचबरोबर स्वयंपाकघरातील अग्निय दिशेला लाल रंगाचा बल्ब लावावा. यामुळे घरात तुम्हाला चांगले परिणाम जाणवतील.

मीठापासून वास्तुदोष कसा दूर करावा?

जर तुमच्या घरात नकारात्मकता ऊर्जा असेल तर त्यासाठी रोज पाण्यात थोडं मीठ मिसळून संपूर्ण घरात हे पाणी शिंपडा. असे केल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता वाढते. तसेच संध्याकाळी घराच्या कानाकोपऱ्यात मीठ ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर फेकून द्यावे. असे केल्याने नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळू शकते.

वास्तुचे हे नियम लक्षात ठेवा

वास्तुशास्त्रानुसार गोल कडा असलेले फर्निचर घरात ठेवणे शुभ मानले जाते. तसेच तुटलेल्या वस्तू, बंद पडलेले घड्याळे, खराब वस्तू घराबाहेर काढाव्या, कारण या गोष्टी नकारात्मक ऊर्जेला चालना देतात.

वास्तुदोष दूर करण्यासाठी काय करावे?

घराच्या ईशान्य कोपऱ्यात उडणारे पक्षी, उगवणारा सूर्य किंवा नद्यांचा फोटो लावा.

घराच्या फायर कॉर्नरमध्ये लाल बल्ब लावावे.

घराच्या अग्निकोपऱ्यात गणपतीचा फोटो लावावा.

घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळस आणि केळीचे रोप लावावे.

घराच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात दिवा लावावा.

घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिका चिन्ह काढावे.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाल टांगून ठेवावी.

कलश घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावा.

घरात रोज कापूर जाळला पाहिजे.

घरात रामायणाचे पठण करा.

टॉयलेट किंवा बाथरूमच्या एका कोपऱ्यात एका बाऊलमध्ये मीठ ठेवा.

टॉयलेट किंवा बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवावी.