मुंबई : आज करवा चौथ व्रत साजरा केला जात आहे. आज स्त्रिया आपल्या पतीसाठी उपवास ठेवतात. त्यांना उत्तम आरोग्य, सौभाग्य, दीर्घायुष्य आणि सातही जन्मात तीच व्यक्ती पुन्हा नवऱ्याच्या रुपात मिळावी अशी कामना करतात. वास्तविक, सनातन परंपरेत, विविध इच्छा आणि देवदेवतांसाठी पाळल्या जाणाऱ्या उपवासाला स्वतःचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की नियमितपणे व्रत केल्याने व्यक्तीला अनेक वैश्विक आणि अलौकिक फायदे आणि जीवनातील अनुभव मिळतात. व्रताचे पालन केल्याने देव-देवता प्रसन्न होतात आणि साधकाला सुख, संपत्ती आणि सौभाग्य देऊन इच्छित वरदान देतात.
पती-पत्नीमधील प्रेम आणि विश्वासाचे बंध दृढ करणाऱ्या उपवासामध्ये चुकून तुमचा उपवास भंग झाले तर तुम्ही घाबरुन जाऊ नका वा निराश होऊ नका, कारण तुमचा उपवास अजाणतेपणी मोडला गेला आहे. उपवास मोडणे हा एक प्रकारचा दोष असल्याने आपण ते टाळण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे. जेव्हा तुमचा हा उपवास जाणूनबुजून किंवा नकळत कोणत्याही कारणामुळे मोडला जातो, तेव्हा दोष किंवा उपवास तोडण्याच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी कोणते उपाय केले जातात.
जाणून घ्या उपाय –
1. जाणूनबुजून किंवा नकळत, जर तुमचा करवा चौथ व्रत मध्येच मोडला असेल तर सर्वप्रथम याबद्दल नाराज किंवा निराश होऊ नका. उपवास सोडल्यानंतर प्रथम आंघोळ करुन शुद्ध अंतःकरणाने पश्चात्ताप करुन या चुकीसाठी देवी गौरीकडे क्षमा मागावी.
2. जर करवा चौथचा उपवास चुकून भंग झाला, तर हा दोष टाळण्यासाठी, विवाहित व्यक्तीने त्यांच्या क्षमतेनुसार श्रृंगारच्या वस्तू, कपडे आणि फळे इत्यादी वस्तूंचे दान करावे.
3. उपवास भंग झाल्यानंतरही देवी गौरीची माफी मागून आपले व्रत ठेवा आणि संध्याकाळी भगवान शिव-पार्वती, स्वामी कार्तिकेय, गणपती आणि चंद्रदेव यांची पूजा विधीवत करा आणि उपवास आणि पूजेदरम्यान झालेल्या चुकांबाबत पुन्हा एकदा माफी मागा आणि तुमच्या पतीच्या सुख-समृद्धीची मनोकामना करा. प्रामाणिक अंतःकरणाने प्रार्थना केल्यावर, पार्वती देवी तुमचे सर्व दोष दूर करेल आणि तुम्हाला अखंड सौभाग्याचे वरदान देईल.
4. चंद्रोदयानंतर जेव्हा तुम्ही चंद्र देवाची पूजा करायला जाता, तेव्हा त्याला प्रार्थना करा की मंत्र आणि औषधांचे स्वामी भगवान चंद्रदेवाला भुतकाळातील झालेल्या माझ्या पापांची क्षमा करा आणि माझ्या कुटुंबाला निरोगी, आनंदी आणि समृद्ध ठेवा.
Karwa Chauth 2021 : सोळा श्रृंगार म्हणजे काय? जाणून घ्या या सणात त्याचे काय आहे महत्त्व?https://t.co/hB9Wp5VK1O#karwachauth2021 |#SolahShringar |#Importance
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 22, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Karwa Chauth 2021 : करवा चौथच्या दिवशी करा हे दोन उपाय, वैवाहिक जीवनातील प्रत्येक समस्या होईल दूर
Vastu | नवीन दागिने आणि कपडे कधी खरेदी करावे, जाणून घ्या योग्य दिवस