मुंबई : ग्रह ताऱ्यांसोबत देवी लक्ष्मीची कृपा असणंही गरजेचं आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीबाबत बरंच काही सांगितलं गेलं आहे. जर देवी लक्ष्मीची तुमच्या कृपा असेल तर काहीच सांगायला नको. रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. पण कधी देवी लक्ष्मी आपल्या घरी सोन पावलाने आली आहे, याबाबत आपल्याला कळत नाही. तसेच आपल्याकडून नकळत काही चुका होतात आणि देवी लक्ष्मी घरातून निघून जाते. त्यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्या घरात वास असल्याचे काही संकेत आहे. हे संकेत ओळखून वागणं ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळतो.
देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी श्रद्धापूर्वक पूजन केलं पाहीजे. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे. कारण देवी लक्ष्मीची कृपा ज्या भक्तांवर असते त्यांना पैशांची कधीच उणीव भासत नाही.
शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. देवीला कमल पुष्प अर्पण करावं. देवी लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाची कृपा प्रात्प व्हावी यासाठी मंत्राचा जाप करावा.
या देवि सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ या मंत्राचा चैत्र नवरात्रीत सलग 9 दिवस श्रद्धापूर्वक जप करावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)