नवी दिल्ली : गरुड पुराण हे सनातन धर्मातील 18 महापुराणांपैकी एक मानले जाते. हे असे एक पुराण आहे, ज्यामध्ये लिहिलेल्या गोष्टींचे वर्णन स्वत: भगवान नारायण यांनी केले आहे. गरुड पुराणात जीवन जगण्याचे धोरण आणि नियम सांगितले आहेत. तसेच कर्मांनुसार मृत्यूनंतरच्या परिस्थितीचेही वर्णन करण्यात आले आहे. जर एखाद्या व्यक्तीने गरुड पुराणात लिहिलेल्या गोष्टी वेळेत समजून घेतल्या. तसेच त्या जीवनात अंमलात आणल्या तर त्या व्यक्तीचे जीवन सुधारण्याबरोबरच मृत्यूनंतरही ती व्यक्ती मोक्ष मिळवू शकते. (If you show more love to these five people, you will suffer)
1. ज्या लोकांचा स्वभाव खूप रागीट आहे. अशा लोकांशी जर तुम्ही अत्यंत सभ्य भाषेत बोललात तर ते तुम्हाला खूप कमकुवत समजतील. तसेच ते तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्ही वाईट व्यक्ती आणि रागीट स्वभावाच्या व्यक्तीशी कठोरपणे वागले पाहिजे. त्यांना दया आणि प्रेम दाखवू नये.
2. जे लोक कामात निष्काळजीपणा दाखवतात तसेच प्रत्येक काम काही ना काही कारण सांगून पुढे ढकलतात, अशा लोकांवर कधीही प्रेम आणि दया दाखवू नका. त्यांच्याशी नेहमी कठोर वागा. तसेच तुम्ही आपले काम कसे करून घेऊ शकता, याचा प्रयत्न करा, अशा प्रकारचे तंत्र आत्मसात करा.
3. जर तुम्ही तुमच्या नोकराशी प्रेमाने वागाल आणि नम्र राहाल, तर तो नोकर तुमच्याशी मित्रासारखा वागू लागेल. अशा परिस्थितीत तो तुमचा अपमानसुद्धा करू शकतो आणि तुमच्या आदेशांचे उल्लंघन करू शकतो. म्हणून नेहमी नोकराशी कठोर राहा आणि आवश्यक तेवढेच बोला.
4. स्त्री हा घराचा आधार मानला जातो. जर एखाद्या स्त्रीने ठरवले तर ती घराला स्वर्ग बनवू शकते. तसेच तिने मनात आणले तर ती बांधलेले घर नष्टही करू शकते. जर स्त्रीला आपले घर एकसंध ठेवायचे असेल तर तिच्याशी व्यवहार करताना थोडे कठोर व्हा. जर तुम्ही तिच्याशी नेहमीच प्रेमाने वागलात, तर ती निरंकुश वागू लागेल आणि मनमानी करू लागेल.
5. जर तुम्ही ढोलके आणि इतर वाद्ये प्रेमाने आणि दयेच्या भावनेने वाजवत असाल तर त्यांचा आवाज कधीही चांगला येणार नाही. पण जर तुम्ही त्यांना कठोरपणे बडवले, वेगाने थाप मारली, तर तुम्हाला हवा तसा आवाज येईल. (If you show more love to these five people, you will suffer)
प्रवासी रिक्षात बसला, चालकानेच निर्जनस्थळी मोबाईल-पैसे हिसकावले, थरार सीसीटीव्हीत कैद, पोलिसांनी कसं पकडलं?https://t.co/WLSEingtu3#KalyanCrime #Crime #CrimeNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 4, 2021
इतर बातम्या
Video | दुधाच्या बॉटल्स दिसताच हत्तीच्या पिल्लांना झाला आनंद, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच
पोलीस असल्याचं भासवलं, एसटी थांबवली, दमदाटी करत चौघांना खाली उतरलं, सिनेस्टाईल 1 कोटी रुपये पळवले