मुंबई : आचार्य चाणक्याच्या यांनी आपण आपले आयुष्य कसे जगायचे यांचे धडे दिले. आयुष्यात येणाऱ्या कठीण गोष्टींना आपण कसे सामोरे जावू शकतो याचे उत्तम शिक्षण आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यातील प्रत्येक पैलूवर आपले विचार मांडले आहेत. त्यांच्या नीतिशास्त्रा या रचनेत त्यांनी ही माहिती दिली आहे. याच रचनेत त्यांनी एक उत्तम माणूस होण्यासाठी आपण आपल्या पाल्यांचे पालन पोषण कसे करु शकता या बद्दल माहिती दिली आहे. आचार्य चाणक्य खूप प्रतिभाव होते. त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्या राजाला सम्राट बनवले. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत आचार्यांचे योगदान बहूमोलाचे आहे.
आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्या नीतीत वैयक्तिक जीवन, राजकारण, पैसा अशा प्रत्येक विषयावर सखोल भाष्य केले आहे. चाणक्य नीतीनुसार पालकांनी नेहमी त्यांच्या मुलांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. पालकांनी सुरुवातीपासूनच मूलांकडे योग्य लक्ष दिले तर त्यांना वाईट सवयींपासूनही वाचवता येईल.
हा आहे श्लोक
माता शत्रुः पिता वैरी येन बालो न पाठितः ।
न शोभते सभामध्ये हंसमध्ये वको यथा ।।
चाणक्य नीतीच्या या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य यांनी स्पष्ट केले आहे की, पालकांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी खूप कष्ट घेणे गरजेचे आहे. ज्ञान आणि शिक्षणाच्या कमतरतेमुळे, मुले आयुष्यात कधीही यश संपादन करु शकत नाही. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी सर्व प्रकारचे कष्ट करावेत, कारण शिक्षण असेल तरच व्यक्ती त्यांच्या आयुष्यात पुढे जावू शकतो.
लालनाद् बहवो दोषास्ताडनाद् बहवो गुणाः ।
तस्मात्पुत्रं च शिष्यं च ताडयेन्नतुलालयेत् ।।
चाणक्य नीतीचा हा श्लोक मुलांना उत्तम माणूस बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की, अती लाड केल्यामुळे लहान मुले वाया जातात. त्यांना चुकीच्या सवयी लागतात. आईने प्रेमासोबतच मुलांवर थोडा कडकपणा दाखवावा. पालकांनी मुलाबद्दल कधीही निष्काळजीपणा करू नये. मुलाचे व्यक्तिमत्व बनवण्यात पालकांचा मोठा वाटा असतो. शिक्षण आणि संस्कारानेच माणसचे व्यक्तिमत्व बनत असते. फक्त पैसा असून तुम्ही आयुष्य जगू शकत नाही. त्यासोबत संस्कारांची जोड लागते.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधित बातम्या
Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम
06 December 2021 Panchang : कसा असेल सोमवारचा दिवस? पाहा काय सांगतय पंचांग
Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा