कार्तिक महिना 2021: कार्तिक महिना कधी सुरु होतो? या काळात तुळशीची पूजा, तिचे महत्व, जाणून घ्या सविस्तर माहिती

| Updated on: Oct 19, 2021 | 4:09 PM

हिंदू धर्मात कार्तिक हा महीना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. हा चातुर्मासाचा शेवटचा महिना आहे. या महिन्यात तुळशीची लागवड आणि आणि लग्न केले जाते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना सर्वात महत्वाचा मानला जातो.

कार्तिक महिना 2021: कार्तिक महिना कधी सुरु होतो? या काळात तुळशीची पूजा, तिचे महत्व, जाणून घ्या सविस्तर माहिती
tulsi
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात कार्तिक हा महीना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. हा चातुर्मासाचा शेवटचा महिना आहे. या महिन्यात तुळशीची लागवड आणि आणि लग्न केले जाते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना सर्वात महत्वाचा मानला जातो. या महिन्यात लक्ष्मी आणि नारायण देवीची श्रद्धेने पूजा करणाऱ्या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. यावेळी कार्तिक महिना 21 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे.

कार्तिक मासास प्ररंभ

कार्तिक महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा सर्वात प्रिय महिना आहे. पुराणात असं म्हटलं जात की याच महिन्यात भगवान विष्णू योग निद्रामधून उठतात आणि आपली कृपा सर्वांवर करतात. याच महिन्यात माता लक्ष्मी देखील या महिन्यात पृथ्वीला भेट देण्यासाठी उतरतात. याच वेळी आपल्या भक्तांना त्या आशीर्वाद देतात. या महिन्यात माता लक्ष्मीची पूजा केल्यास आपल्या आर्थिक आयुष्यावर त्याचा खूप फायदा होतो. एखाद्या व्यक्तीस कर्ज किंवा पैशाची चणचण भासत असल्यास त्या व्यक्तीने यावेळी तुळशीची पुजा केल्यास त्याचा जास्त फायदा होतो.यावेळी कार्तिक महिना 21 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे.

तुळशी पूजेचे महत्व

हिंदू धर्मात तुळशी पूजेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा विशेषतः या काळात केलेली पुजा जास्त फलदायी असते या काळात शालिग्रामच्या रूपात भगवान विष्णू आणि तुळशीचे लग्नही केले जाते. तुळशीची पूजा केल्याने यमदूतांची भीती संपते, अशी समजूत आहे. या महिन्यात दिवे दान केल्याने पुण्य देखील प्राप्त होते.

या गोष्टी लक्षात ठेवा

कार्तिक महिन्यात आहारातही बदल होतात. कार्तिक महिन्यापासून हिवाळा सुरू होतो. म्हणून, या महिन्यापासून स्निग्ध पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात करा. त्यामध्ये सुका मेवा आणि गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्या गोष्टीं शरिरासाठी गरम असतात आणि जास्त काळ ऊर्जा टिकवून ठेवतात. शास्त्रात कार्तिक महिन्यात कडधान्ये (डाळी) खाण्यास मनाई करण्यात आहे. या महिन्यात दुपारी झोपण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो… अहो वाचून तर बघा

Kojagiri purnima 2021 | कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध पिण्याचं शास्त्रीय कारण माहितीय?

Kojagiri purnima 2021 | आता आपल्या प्रियजनांना द्या मराठीतून कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा