धार्मिक विधी आणि शिवपूजेसाठी श्रावण महिना हा महत्त्वाचा काळ असतो. श्रावण महिना आध्यात्मिक आणि भक्तीचा महत्त्वाचा महिना मानला जातो. धार्मिक मान्यतांनुसार, श्रावण हा भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात शुभ महिना मानला जातो. या काळात भगवान शिव पृथ्वीवर येतात आणि आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. काही लोकं या कालावधीत सोमवारी उपवास करतात. श्रावण महिन्यात अनेक महत्त्वाचे नियम असतात. ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. आपण उपवास करत नसला तरीही, आपण या महिन्याचे नियम पाळले पाहिजेत, जे खालीलप्रमाणे आहेत –
सकाळी लवकर उठणे
मंदिराची रोज स्वच्छता करणे
शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाला पाणी, दूध, साखर, तूप, दही आणि मध (पंचामृत) अभिषेक करणे.
श्रावण महिन्यात ब्रह्मचर्य पाळणे.
शक्य तितके पाणी पिऊन हायड्रेटेड राहणे.
संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे.
शक्य तितके दान करणे.
धार्मिक कार्यावर भर देणे
गरिबांना अन्नदान करणे.
तामसिक अन्न, मांस, अंडी, लसूण आणि कांदा खाणे टाळावे.
या महिन्यात चुकूनही दारूचे सेवन करू नये.
दूध पिणे टाळावे.
पॅकेज केलेल्या वस्तूंचे सेवन टाळावे.
कोणाशीही गैरवर्तन करणे टाळावे.
कोणाबद्दल वाईट बोलू नये.
सूडबुद्धीच्या गोष्टींपासून दूर राहणे.
शिवपूजेत हळदीचा समावेश करू नये.
भगवान शंकराला केतकीचे फूल अर्पण करणे टाळावे.
श्रावण महिन्यात जर वरील गोष्टी पाळल्या नाहीतर लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते.