मुंबई : एकादशी महिन्यातून दोनदा येते. एकदा कृष्ण पक्षात आणि दुसऱ्यांदा शुक्ल पक्षात. कृष्ण पक्षातील एकादशी पौर्णिमेनंतर येते आणि शुक्ल पक्षातील एकादशी अमावस्येनंतर येते. शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात. ही एकादशी शास्त्रात अत्यंत फलदायी असल्याचे सांगितले आहे. एकादशीला भगवान विष्णूचे व्रत करतात. या दिवशी विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. जया एकादशीचे (Jaya Ekadashi) व्रत गृहस्थ आणि गृहस्थ नसलेले दोघेही करू शकतात. एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते.
हिंदू कॅलेंडरनुसार, एकादशी तिथी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 08:49 वाजता सुरू होईल आणि 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 09:55 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत 20 फेब्रुवारीला जया एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. जया एकादशी व्रताची पारण वेळ २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.५५ ते 9.11 अशी असेल.
जया एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी राहते. असे म्हणतात की या एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला भूत आणि भय इत्यादीपासून मुक्ती मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)