Jaya Ekadashi: आज जया एकादशी, या सोप्या उपायांनी मिळेल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशिर्वाद

| Updated on: Feb 01, 2023 | 1:54 PM

असे मानले जाते की, एकादशीचे व्रत करणार्‍यांना सर्व सुख प्राप्त होतात. याशिवाय भगवान विष्णूच्या आशीर्वादाने भक्ताच्या जीवनातून सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात आणि मोक्ष प्राप्त होतो.

Jaya Ekadashi: आज जया एकादशी, या सोप्या उपायांनी मिळेल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशिर्वाद
भगवान विष्णू
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, आज जया एकादशी (Jaya Ekadashi) आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ही एकादशी साजरी होते. हिंदू धर्मात जया एकादशीला विशेष महत्त्व आहे. जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते. यासोबतच या दिवशी उपवास ठेवण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की, एकादशीचे व्रत करणार्‍यांना सर्व सुख प्राप्त होतात. याशिवाय भगवान विष्णूच्या आशीर्वादाने भक्ताच्या जीवनातून सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात आणि मोक्ष प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रात एकादशी व्रताशी संबंधित काही विधी सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्याने व्रताचे फळ लवकर मिळते.

जया एकादशीचा शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, जया एकादशी 31 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच काल रात्री 11.53 वाजता सुरू झाली आहे आणि ती आज 01 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 02.01 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार 01 फेब्रुवारीला म्हणजेच आजच जया एकादशीचे व्रत पाळले जात आहे. जया एकादशीच्या पारणाची वेळ 02 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 07.09 ते 09.19 पर्यंत असेल. यासोबतच 02 फेब्रुवारी रोजी सकाळी 07.10 ते मध्यरात्री 03.23 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग राहील.

जया एकादशी पूजा विधी

सकाळी स्नान केल्यानंतर सर्वप्रथम भगवान विष्णूचे स्मरण करून व्रताचा संकल्प करावा. यानंतर देवघराची स्वच्छता करून पूजा सुरू करावी. पूजेमध्ये धूप, दीप, पंचामृत इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश करा. त्यानंतर श्री हरी विष्णूच्या मूर्तीची स्थापना करून त्यांना फळे व फुले अर्पण करा. यासोबत विष्णु सहस्त्रनामाचा जप करावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करावा.

हे सुद्धा वाचा

जया एकादशी व्रत 2023 परण वेळ

उपवास सोडण्याला पारण म्हणतात. 02 फेब्रुवारी रोजी जया एकादशी व्रत साजरे केले जाणार आहे. या दिवशी व्रताची वेळ सकाळी 07.09 ते 09.19 अशी आहे.

जया एकादशीचे महत्त्व

असे मानले जाते की, जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक उर्जेचा प्रभाव असेल तर जया एकादशीचे व्रत केल्यास त्याचा प्रभाव संपतो. या एकादशीला भूमी एकादशी आणि भीष्म एकादशी असेही म्हणतात. या व्रतामध्ये भगवान विष्णूंचे  नामस्मरण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. या दिवशी भगवान विष्णूचे कीर्तन करणे देखील खूप शुभ असते.

जया एकादशीच्या दिवशी करा हा विशेष उपाय

  1. जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी सकाळी स्नान करून प्रथम घरातील मंदिरात तुपाचा दिवा लावावा आणि भगवान विष्णूचे आवाहन करावे. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन भक्तावर कृपा करतील.
  2. जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचीही पूजा करावी. असे मानले जाते की असे केल्याने जीवनात प्रगती होते आणि भगवान विष्णूच्या कृपेने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.
  3. जया एकादशीच्या दिवशी जगाचे पालनकर्ता श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळ्या फुलांचे हार, पिवळी मिठाई, फळे इत्यादी अर्पण करा.
  4. पिंपळाच्या झाडात भगवान विष्णू वास करतात असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. जया एकादशीच्या दिवशी मंदिरात असलेल्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याजवळ देशी तुपाचा दिवा लावावा.
  5. एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नये. या दिवशी फक्त एकदाच खा आणि तेही फक्त फलाहार असावे. या दिवशी भात खाणे टाळावे.
  6. पूजेनंतर गाईला चारा खाऊ घाला आणि गरजूंना यथाशक्ती दान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)