मुंबई : एकादशी प्रमाणेच प्रदोष व्रतलाही (Pradosh Vrat 2021) खूप पुण्यदायी मानलं जातं. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळला जातो. हा दिवस शिवभक्तांसाठी खूप महत्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. धर्मग्रंथानुसार प्रदोष व्रताचे नाव आणि महत्त्व त्या दिवसानुसार असते (July Month First Pradosh Vrat 2021 Know The Tithi And Shubh Muhurat How To Worship Lord Shiva).
आषाढ महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत 7 जुलै 2021 रोजी बुधवारी आहे. बुधवारचा प्रदोष बुध प्रदोष व्रत म्हणूनही ओळखला जातो. मान्यता आहे की भोलेनाथ आपल्या भक्तांची भक्ती पाहून खूप लवकर प्रसन्न होतात. महादेव मनुष्य, राक्षस, भुत, यक्ष इत्यादींचे आराध्य आहेत. चला प्रदोष व्रतचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा पद्धत जाणून घेऊया –
? प्रदोष व्रत आरंभ – 7 जुलै दुपारी 01:02 वाजता
? प्रदोष व्रत समाप्त – 8 जुलै 2021 रोजी पहाटे 3.20 वाजता
? भगवान शिवच्या पूजेचा शुभ मुहूर्त – संध्याकाळी 07:12 ते 09:20
शास्त्रानुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते.
प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि व्रताचा संकल्प करावा.
या दिवशी भाविक निर्जल किंवा फलाहार उपवास ठेवतात.
भांग, धतुरा, बेलपात्र, फुले आणि जलने भगवान शंकरांचा अभिषेक करावा.
पूजेवेळी देवी पार्वतीला लाल ओढणी आणि श्रृगांराच्या वस्तू अर्पण कराव्यात.
विधीवत शिव पार्वतीची पूजा केल्याने कुटुंबातील सर्व त्रास दूर होतात.
दिवसानुसार प्रदोष व्रताला वेगवेगळे महत्त्व असते. जुलै महिन्यातील प्रदोष बुधवारी येत आहे, म्हणून त्याला बुध प्रदोष असे म्हणतात. बुधवारी प्रदोष उपवास ठेवल्याने भगवान शिव जीवनातील सर्व त्रास दूर करतात, घरात सुख आणि समृद्धी येते. मान्यता आहे की, हे व्रत केल्याने कुटुंबातील मुलांचे आरोग्य चांगले राहते आणि कुशाग्र बुद्धी मिळते.
मान्यता आहे की, प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव प्रसन्न होतात आणि कैलासमध्ये तांडव करतात आणि सर्व देवी-देवता त्यांची स्तुती करतात. म्हणून प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा केल्याने आणि उपवास केल्याने भोलेनाथ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा केली जाते. या दिवशी उपवास केल्याने भोलनाथ तुमचे सर्व त्रास दूर करतात. तसेच, घरात सुख-समृद्धी नांदते.
Pradosh Vrat 2021 | आषाढ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधीhttps://t.co/IgR40rs1CN#PradoshVrat #AshadhMonth #Mahadev #LordShiva
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 27, 2021
July Month First Pradosh Vrat 2021 Know The Tithi And Shubh Muhurat How To Worship Lord Shiva
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Ashadha Month 2021: मनोकामना पूर्ण करणाऱ्या आषाढ महिन्याला सुरुवात, जाणून घ्या त्याचं महत्व?