मुंबई : हिंदू धर्मात अमावस्येच्या तिथीला विशेष महत्व आहे. अमावस्येच्या दिवशी दान धर्म केला तर पुण्य लाभतं अशी धारणा आहे. यावेळेस अमावस्य 10 जुनला येतेय. या अमावस्येला ज्येष्ठ अमावस्या म्हणतात. याच अमावस्येला वट सावित्री, शनी जयंतीसारखे सण आहेत. यादिवशी पुजा पाठ केले तर विशेष फळाची प्राप्ती होते. याच दिवशी पित्रांच्या शांतीसाठी विधी केले जातात. चला जाणून घेऊया की, यावेळेसची अमावस्या का खास आहे? (Jyeshtha Amavasya 2021 puja Vidhi And muhurt)
ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशीच यावर्षीचं पहिलं सूर्यग्रहण लागेल. ते दुपारी 1 वाजून 42 मिनिट ते 6 वाजून 41 मिनिटांनी सुरु होईल. पण हे ग्रहण भारतात दिसणार नाही. ज्येष्ठ अमावस्येचा शुभ मुहूर्त अमावस्या तिथी प्रारंभ-दुपारी 1 वाजून 57 मिनिट अमावस्या तिथी समाप्त- सायंकाळी 4 वाजून 22 मिनिटांपर्यंत
अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करावं. जर तुम्ही नदीला जाऊ शकत नाही तर अंघोळीच्या पाण्यात थोडसं गंगाजल टाकावं. तांब्याच्या भांड्यात जल, अक्षता आणि लाल फुल टाकून भगवान सूर्याला अर्घ्य द्यावं. त्यानंतर पित्रांचे विधी करावेत. याच दिवशी पित्रांच्या आत्मशांतीसाठी पुजा करा आणि उपवास ठेवा. नंतर गरिबांना दक्षिणा द्या. असं केल्यामुळे पितृदोषातुन मुक्ती मिळते.
या अमावस्येच्या तिथीला शनी जयंती आणि वट सावित्रीची पुजा केली जाते. वटसावित्रीची पुजा दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पोर्णिमेला केली जाते. याच दिवशी महिला स्वत:च्या नवऱ्याच्या दिर्घ आयुष्यासाठी व्रत ठेवतात.
दरवर्षी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते. याच दिवशी शनी देवाचा जन्म झाला होता. असं मानलं जातं की शनी जयंतीला त्याची पुजा केली तर शनी दोष दूर होतात. याच दिवशी पुजापाठ केला तर फलप्राप्ती होते. शनीदेव हा सूर्यदेव आणि माता छायेचा पुत्र आहे.
(Jyeshtha Amavasya 2021 puja Vidhi And muhurt)
हे ही वाचा :
Vastu Tips: घरात पैशांची चणचण? कदाचित तुमच्या ह्या सवयी तर त्याला जबाबदार नाहीत?
Chanakya Niti: अशी तीन कामं, जे तुमचा मान सन्मान कमी करतात, कधीच करु नका!