Kamika Ekadashi : या दिवशी साजरी होणार कामिका एकादशी, स्नान आणि दानाचे असे आहे महत्त्व

| Updated on: Jul 11, 2023 | 7:32 PM

कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशीच्या पूजेबरोबरच स्नान-दानाचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.

Kamika Ekadashi : या दिवशी साजरी होणार कामिका एकादशी, स्नान आणि दानाचे असे आहे महत्त्व
एकादशी
Image Credit source: Social media
Follow us on

मुंबई : आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी (Kamika Ekadashi 2023) म्हणून ओळखले जाते, यावर्षी कामिका एकादशीचे व्रत 13 जुलै रोजी पाळले जाणार आहे. भगवान विष्णूसोबतच कामिका एकादशीला तुळशीपूजेही महत्त्व आहे,  हे व्रत केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते, तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशी घार्मिक मान्यता आहे.

कामिका एकादशी तारीख

आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 12 जुलैला संध्याकाळी 5.59 वाजता सुरू होईल आणि 13 जुलैला संध्याकाळी 6.24  वाजता संपेल. 13 जुलै रोजी उदयतिथी निमित्त कामिका एकादशी व्रत पाळण्यात येणार आहे.

कामिका एकादशीमध्ये स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व

कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशीच्या पूजेबरोबरच स्नान-दानाचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. जर तुम्हाला नदीवर जाता येत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगेच्या पाण्याचे काही थेंब टाका. कामिका एकादशीच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते, या दिवशी तुम्ही पिवळे कपडे आणि पिवळे अन्नधान्य गरजू लोकांना दान करू शकता. यासोबतच पूजा करताना पिवळे कपडे घालावेत.

हे सुद्धा वाचा

बृहस्पति मजबूत करण्यासाठी हे काम करा

जर तुमच्या कुंडलीत बृहस्पति कमजोर असेल तर कामिका एकादशीच्या दिवशी पूजेदरम्यान भगवान विष्णूला पिवळे फूल आणि मिठाई अर्पण करा. यामुळे कुंडलीत गुरू मजबूत होईल.

कामिका एकादशी 2023 व्रत कथा

पौराणिक कथेनुसार, ‘एका गावात ठाकूर नावाचा एक माणूस राहत होता, तो खूप रागिट होता. एके दिवशी ठाकूरचे एका ब्राह्मणाशी भांडण झाले आणि त्याने रागाच्या भरात ब्राह्मणाला मारले. नंतर ठाकूर यांनी आपल्या चुकीबद्दल खेद व्यक्त केला आणि माफी मागितली. दुसरीकडे, एका ब्राह्मणाच्या हत्येमुळे, ठाकूरवर ब्राह्मणाच्या हत्येचा आरोप होता. ठाकूर यांनी एका सिद्ध ऋषींना या दोषातून मुक्त होण्याचा मार्ग विचारला. तेव्हा ऋषींनी त्याला  कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. ठाकूरांनी एकादशीला पूर्ण भक्तिभावाने उपवास केला आणि भगवान विष्णूंनी त्याला दर्शन देऊन त्यांच्या पापांची मुक्तता केली. तेव्हापासून हे व्रत कामिका एकादशी म्हणून ओळखले जाऊ लागले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)