मुंबई : पौर्णिमा तिथी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा दिवस आहे. काही भक्त या विशेष दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात आणि उपवास करतात. यावर्षी 29 ऑक्टोबरपासून कार्तिक महिना सुरू झाला, जो भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो. अशा परिस्थितीत जोतिषी पराग कुळकर्णी यांनी कार्तिक महिन्याची पौर्णिमा (Kartik Purnima 2023) कधी येत आहे आणि या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी या बद्दल माहिती जाणून घेऊया.
हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याची पौर्णिमा रविवार, 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 03:53 वाजता सुरू होत आहे. त्याच वेळी, सोमवार, 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 02:45 वाजता पौर्णिमा तिथी समाप्त होईल. अशा स्थितीत कार्तिक महिन्याची पौर्णिमा 27 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे.
धार्मिक मान्यतांनुसार, पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुऊन जातात. तसेच या तिथीला गरीब आणि गरजूंना दान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होऊ शकते. तसेच या दिवशी घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. असे मानले जाते की या दिवशी जो भक्त संपूर्ण घराची योग्य प्रकारे स्वच्छता करतो त्याच्या घरी देवी लक्ष्मीचे आगमन होते.
पौर्णिमा तिथीला तांदूळ, साखर, दूध इत्यादी पांढर्या वस्तूंचे दान केल्यास साधकाला शुभ फळ मिळू शकते. हिंदू धर्मात दिवा दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते, त्यामुळे या दिवशी संध्याकाळी दिवा दान करणे आवश्यक आहे. पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये दिवे लावल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात असे मानले जाते.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. या दिवशी मांसाहार टाळा आणि सात्विक आहार घ्या. तसेच या दिवशी मद्यप्राशन करू नये. कार्तिक पौर्णिमेच्या विशेष प्रसंगी, एखाद्याने कोणाचाही अपमान, द्वेष आणि शिवीगाळ करू नये, यामुळे भगवान विष्णूंचा राग येऊ शकतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)