मुंबई : गजबजलेल्या महानगरांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे लोक लहान घरांमध्ये राहतात. पण असे असताना देखील घराची सजावट करताना तुम्ही वास्तुशास्त्रातील काही नियम लक्षात ठेवायला हवेत. वास्तुशास्त्रातील नियमांकडे आपण दुर्लक्ष केले तर याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत हे नियम.
हे आहेत नियम :
- वास्तूच्या नियमांनुसार, जर तुमचे घर आयताकृती असेल आणि उत्तर आणि पूर्व दिशेला अधिक मोकळी जागा असेल, तर ते तुमच्यासाठी खूप शुभ आहे.
- वास्तुशास्त्रानुसार,घराच्या किंवा इमारतीच्या आजूबाजूला कोणतेही स्मशान किंवा स्मशान किंवा कचराकुंडी असू नये.
- ज्या घराची बाल्कनी उत्तर आणि पूर्व दिशेला असते ती वास्तू खूप शुभ मानली जाते.
- घरामधील मधील ड्रॉईंग रूम उत्तर-पश्चिम, दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावी. ड्रॉईंग रूममध्ये जड फर्निचर आणि सामान नेहमी नैऋत्य दिशेला ठेवावे.
- जर तुम्ही घरात मंदिर बांधण्याचा विचार करत असाल तर उत्तर-पूर्व कोपरा निवडा.
- जागेच्या कमतरतेमुळे तुम्हाला तुमच्या कोणत्याही खोलीत मंदिर बनवावे लागत असेल, तर त्यासाठी त्या खोलीचा ईशान्य कोपराही निवडा. वास्तुनुसार पूजेच्या ठिकाणी संगमरवराचा वापर करु नये.
- मंदिर फ्लॅटमध्ये, स्वयंपाकघरात किंवा टॉयलेट-बाथरूमच्या शेजारी बांधू नये. वास्तुनुसार हा एक गंभीर वास्तु दोष आहे.
- वास्तूनुसार मुलांच्या अभ्यासाची खोली नेहमी उत्तर-पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावी. त्याच वेळी, मुलांची खोली नेहमी हलक्या रंगांनी रंगविली पाहिजे. असे केल्यास तुमच्या घराची प्रगती होईल. जास्त पैसा हाती येईल.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधित बातम्या
Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम
Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा
Hanuman Puja benefits : मनोभावे पूजा करा, संकटमोचक स्वत: मदतीला येतील