मुंबई : हिंदू धर्मात कोणतेही काम करण्यासाठी शुभ वेळ पाहिली जाते. लग्नासारख्या अत्यंत महत्त्वाच्या समारंभासाठी सर्वोत्तम मुहूर्त काढणे महत्त्वाचे मानले जाते. 2022 मध्ये तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर हे काही शुभ मुहूर्त फक्त तुमच्यासाठी. ज्योतिषी आणि विश्वस्त काशी विश्वनाथ मंदिर पं.दीपक मालवीय यांनी tv9ला दिलेल्या माहितीनुसार हे मुहूर्त सांगण्यात आले आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार लग्नासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे वार निवडण् खूप फायद्याचे ठरते. मंगळवार हा विवाहासाठी चांगला दिवस मानला जात नाही. याशिवाय द्वितीया तिथी, तृतीया तिथी, पंचमी तिथी, सप्तमी तिथी, एकादशी तिथी, त्रयोदशी तिथी या शुभ आणि उत्तम मानल्या जातात, तर चतुर्थी, नवमी, चतुर्दशी तिथी विवाहासाठी शुभ मानली जात नाहीत. तसेच दोन ग्रह अस्त झाल्यावर लग्नाचा मुहूर्त काढला जात नाही. लग्नाच्या शुभ मुहूर्ताकडे पाहताना शुक्र आणि गुरूचा नक्कीच विचार केला जातो.
लग्नाची शुभ तारीख निवडताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, चातुर्मासात भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रामध्ये सागरात जातात तेव्हा विवाह आणि कोणतेही शुभ कार्य करता येत नाही. सनातन परंपरेत विवाहासाठी योग्य वेळ निवडण्यासाठी मुहूर्त चिंतामणी आणि पंचांग या ज्योतिषशास्त्राच्या सर्वमान्य ग्रंथाची मदत घेतली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य ग्रह कर्क, सिंह, कन्या, तूळ, धनु आणि मीन राशीत प्रवेश करतात तेव्हा तो काळ विवाहासाठी चांगला मानला जात नाही.
2022 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त
जानेवारी महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 16, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30
फेब्रुवारी – 4, 5,6, 9, 10, 11, 16, 17, 18, 19, 20
एप्रिल महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 17, 19, 20, 21, 22, 23, 27, 28
मे महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 2, 3, 4, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 21, 22, 26
जून महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 1, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 21, 22, 26
जुलै महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 3, 4, 5, 6, 7, 8, 9
नोव्हेंबर महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 25, 26, 27, 28
डिसेंबर महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त – 2, 3, 7, 9, 13, 14
संबंधित बातम्या :
Vastu: Vastu : नवीन वर्षात घर घेताय?, वास्तुनियमांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…
ज्योतिष टिप्स: नोकरी मिळण्यात अडचणी येत आहे? मग हे खास उपाय करून पाहा!