मुंबई : हिंदू धर्मात सण आणि व्रतांना विशेष महत्त्व प्राप्त आहे. पण आपल्याला यातील बरेच सण आणि व्रत महितच नसतात. असेच एक व्रत म्हणजे प्रदोष व्रत. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत साजरे केले जाते. पुराणामध्ये प्रदोष व्रत हे भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा विधीपूर्वक केली जाते. या वर्षी हे व्रत 16 डिसेंबरला येणार आहे. या दिवशी उपवास आणि भगवान शंकराची पूजा केल्याने आयुष्यातील प्रत्येक इच्छा पुर्ण होते अशी मान्यता आहे.
प्रदोष काळाची विधी
पंचांगानुसार प्रत्येक त्रयोदशीला प्रदोष कालात पूजेची वेळ वेगळी असते. तसे, सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या आधीच्या वेळेला प्रदोष काल म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर या वेळेस कातळ वेळ देखील म्हणतात.सोम प्रदोष व्रताच्या दिवशी स्नान इत्यादीं आटोपल्यानंतर हलके लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालावे. यानंतर हळदीकुंकवाचे शिवलिंग बनवा आणि चांदी किंवा तांब्याच्या कळशातून शिवलिंगाला शुद्ध मधाचा प्रवाह द्या. त्यानंतर शुद्ध पाण्याच्या प्रवाहाने अभिषेक करा.
काय आहे प्रदोष काळाची आख्यायिका
पौराणिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी विष बाहेर आले तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते भयंकर विष प्यायले. हे विष इतके प्रभावी होते की ते प्यायल्यानंतर महादेवाचा घसा निळा पडला आणि विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या अंगात असह्य जळजळ सुरू झाली. तेव्हा देवांनी महादेवाचा मत्सर जल, बेलपत्र इत्यादींनी कमी केला. महादेवाने विष पिऊन जगाला विषाच्या प्रभावापासून वाचवले होते, त्यामुळे सर्व जग आणि देव महादेवाचे ऋणी झाले. ही घटना घडली ती वेळ त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळात घडली म्हणूनच या दिवसाला विषेश महत्त्व आहे.
संबंधित बातम्या
Zodiac | ‘कठोर परिश्रम’ हीच या राशींच्या व्यक्तींची ओळख, तुमची रास यामध्ये आहे का ?