पंचतत्त्वांवर आधारित वास्तू नियम हे आपल्या सुख-समृद्धीशी निगडित आहेत, त्यामुळे घर बांधताना आणि सजवताना कधीही वास्तु नियमांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. घराचा मुख्य भाग म्हणजे ड्रॉईंग रूम घरात आलेले पाहूणे किंवा महत्त्वाची व्यक्ती आल्यास आपण त्यांना येथेच बसवतो. त्यामुळे ड्रॉईंग रूम बनवताना आणि सजवताना वास्तूचे नियम लक्षात ठेवा. चला जाणून घेऊया की वास्तुनुसार ड्रॉईंग रूम सजवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल.
वास्तूशासनुसार जेव्हा तुम्ही ड्रॉईंग रूममध्ये समोरच्या भिंतीवर तुमच्या कुटुंबाचे फोटे लावा ही गोष्ट शुभ मानली जाते. हे चित्र नेहमी लाल रंगाच्या फ्रेममध्ये ठेवा.
ड्रॉईंग रूममध्ये फॅमिली फोटो प्रमाणेच तुम्ही हंसाचा फोटो भिंतीवर देखील लावू शकता.
वास्तूनुसार ड्रॉईंग रूममध्ये टीव्ही नेहमी आग्नेय कोनात ठेवावा. टीव्ही कधीही ईशान्य किंवा आग्नेय दिशेला ठेवू नये. त्याचप्रमाणे टेलिफोन देखील आग्नेय कोनात किंवा पूर्व दिशेला ठेवावा. आग्नेय कोनात म्युझिक सिस्टीम सारख्या मनोरंजनाच्या वस्तू असणे देखील शुभ आहे.
वास्तूशास्त्राच्या नियमांनुसार, कूलर नेहमी पश्चिम दिशेला ठेवावा. वास्तूनुसार ड्रॉईंग रूममधील एसी पश्चिम कोनात आणि हिटर आग्नेय कोनात असावा.
वास्तूशास्त्राच्या नियमांनुसार ड्रॉईंग रूमच्या भिंतींवर नेहमी हलके रंग लावावेत. त्याचप्रमाणे ड्रॉईंग रुममधील खिडकी आणि स्कायलाइटचे ग्लास फिकट रंगाचे असावेत.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
पितृदोषाच्या प्रकोपाचा सामना करताय, मग हे उपाय करा, मिळेल सर्व संकटांपासून मुक्ती
Sphatik Mala | स्फटिक माळेचे जादूई उपयोग तुम्हाला माहीत आहेत का ? आजच वापरुन पाहा