मुंबई : हिंदू धर्मात शंख शुभ आणि मंगल गोष्टीचे प्रतीक मानले जाते. सनातन परंपरेत तर शंखशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते. हिंदू धर्मातील देवांच्या हातात देखील शंखांचे अस्तित्व दिसून येते. पुराणामध्ये अशी मन्याता आहे की शंख समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर आले. त्यामुळे त्याची उत्पत्ती समुद्रातूनच झाली आहे. ‘शंखचूड’ नावाच्या राक्षसापासून शंखाची उत्पती झाली आहे असी ही मान्यता आहे, या राक्षसाच्या हाडांमधून 1008 प्रकारचे समुद्री अलौकिक शंख तयार झाले.
असे मानले जाते की पूजेच्या वेळी शंखनाद केल्याना मनातील इच्छा पूर्ण होतात. जेथे पूजेमध्ये शंख वाजवला जातो, तेथे भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहते. शंखातून निघणारा आवाज नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. त्याचप्रमाणे शंख फुंकल्याने फुफ्फुसे मजबूत राहतात. शंखवाजवल्यामुळे पूरक, कुंभक आणि प्राणायाम एकत्र केले जातात. अशा प्रकारे, दररोज शंखनाद करुन, एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही फायदे मिळतात आणि घर आणि आसपासचे वातावरण शुद्ध होते.
दक्षिणमुखी शंख घरात ठेवल्यास सुख आणि समृद्धीसाठी लाभते असे मानले जाते. या शंखचे पोट दक्षिणेकडे उघडे असते आणि त्याचे तोंड बंद असते, त्यामुळे ते वाजवण्यासाठी उपयोग होत नाही. दक्षिणावर्ती शंख त्याच्या इष्टाची पूजा करण्यासाठी वापरला जातो. दक्षिणावर्ती शंख घरात ठेवल्याने उत्तम आरोग्य, कीर्ती आणि संपत्ती मिळते.
इतर बातम्या :
Margi Shani 2021 | या राशीच्या लोकांना पुढच्या 6 महिन्यात सगळं काही मिळेल, शनिदेवाची खास कृपा!
Zodiac Signs | ‘या’ राशीचे लोक नेहमी असतात ओव्हर कॉन्फिडेंट, ‘मी’पणात गमतात खूप काही
Happy Dussehra 2021 Wishes | आपल्या प्रियजनांना द्या दसऱ्याच्या हटके शुभेच्छा https://t.co/veWg6JMSqY#navratri2021 | #Dussehra2021Wishes | #Dussehra
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2021