मुंबई : हिंदू धर्मात गंगेच्या पाण्याला विषेश महत्त्व प्राप्त आहे. कोणतीही पूजा गंगेच्या पाण्याशिवाय अपूर्ण मानली जाते. असे मानले जाते की गंगाजल फक्त शिंपडल्याने दुःख, दुर्दैव आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात गंगाजलाचे महत्त्व आणि त्यासंबंधी गोष्टी
गंगाजलाचे महत्त्व
कोणत्याही पूजा किंवा अन्यथा शुभ कार्या करण्यापूर्वी शुद्ध मनाने गंगाजलाचा वापर केला जातो. गंगाजलाचा उपयोग देवतांच्या शुद्धीकरणासाठी किंवा आत्मशुद्धीसाठी केला जातो. गंगा भगवान शिवाच्या जटांमधून निघते अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराला गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्याचे खूप महत्त्व आहे. भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी शिव साधक कंवर घेऊन पवित्र गंगेचे पाणी भरून आपापल्या शिवधामात जाऊन शिवाला गंगाजलाने अभिषेक करतात.
गंगाजलाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
?जर तुम्ही गंगेत स्नान करणार असाल तर कधीही चप्पल किंवा बूट घालून गंगेत प्रवेश करू नका.
?गंगेत गेल्यानंतर साबण लावून आंघोळ करू नका, कपडे वगैरे धुवू नका. गंगेत स्नान केल्यानंतर ओले कपडे घरात आणून धुवा.
?गंगेत उभे राहून कधीही कोणाशीही खोटे बोलू नका किंवा अपशब्द बोलू नका.
?गंगाजल कधीही अपवित्र ठिकाणी ठेवू नये. गंगाजल नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्याजवळ म्हणजेच पूजास्थानाजवळ ठेवावे.
?शक्य असल्यास, नकारात्मक शक्ती टाळण्यासाठी दररोज घरात गंगाजल शिंपडत रहा.
संबंंधीत बातम्या :
lucky charms | घरातून बाहेर गेल्यावर ‘या’ 4 गोष्टी पाहिल्यात तर तुमचं काम झालंच म्हणून समजा