मुंबई : अनेक घरांमध्ये सतत वाद होत असतात. अनेक कुटुंबात मारामारी, भांडणे सर्रास पाहायला मिळतात. या भांडणांची अनेक कारणे असू शकतात परंतु कुटुंबात एकत्र राहण्यासाठी हे वाद दुर होणं गरजेचे असते. हे वाद दूर करण्यासाठी वास्तुशास्त्र आपल्याला मदत करते. तुमच्या घरातील अनेक गोष्टी वास्तुदोषासाठी कारणीभूत असतात.
अशा परिस्थितीत तुम्ही काही वास्तु टिप्स वापरु शकता, ज्यामुळे तुम्हाला कौटुंबिक जीवनातील त्रास टाळता येईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या वास्तू टिप्स.
खोलीत मीठ ठेवा
वास्तुशास्त्रानुसार मीठामध्ये पंचमाहाभूत असतात. म्हणजेच आपली पृथ्वी ज्या 5 तत्त्वांपासून बनली आहे त्यांपासूनच मीठ तयार झाले आहे. जर घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता उर्जा असते तर ती मीठामुळे आपल्याला काढता येते. त्यासाठी खोलीच्या एका कोपऱ्यात तुम्ही रॉक मिठाचा तुकडा ठेवू शकता. या कोपऱ्यात एक महिना मीठ सोडा. एक महिन्यानंतर, ते काढून टाका आणि रॉक मिठाच्या नवीन तुकड्याने बदला.
घराचा प्रत्येक कोपरा व्यवस्थित स्वच्छ करा
वास्तूनुसार कुटुंबात शांती राहण्यासाठी घराची योग्य प्रकारे साफसफाई करणे खूप गरजेचे आहे. दररोज घराचा प्रत्येक कोपरा योग्य प्रकारे स्वच्छ केल्याची खात्री करा. तुमचे घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा.
घरात आरसा लावा
घरामध्ये जास्तीत जास्त आरसे लावावेत. यामुळे तुमचे घर सुंदर तर बनवेलच पण तुमच्या घराला चांगली ऊर्जाही देईल. आरसा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो असे मानले जाते. यामुळे कुटुंबातील सर्वांना फायदा होईल आणि भांडणे कमी होतील. घरात कोणतेही संकट येणार असेल तर घरातील काचेची गोष्ट पहिली तुटते किंवा काचेला तडा जातो अशी मान्यता आहे.
एक लहान कारंजे ठेवा
जर तुमच्या घरात छोटीशी बाग असेल किंवा तुमच्या घरात अशी जागा असेल तर तुम्ही तिथे कारंजे ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरामध्ये वाहणारे पाणी सकारात्मक ऊर्जा आणू शकते.
भगवान बुद्धाची मूर्ती ठेवा
भगवान बुद्ध शांतीचे प्रतिनिधित्व करतात.याच कारणामुळे अनेक लोक भगवान बुद्धांच्या मूर्ती घरात ठेवतात. तुम्ही त्यांना बाल्कनीत किंवा तुमच्या घराच्या आत, राहत्या जागेत ठेवू शकता. भगवान बुद्धाची मूर्ती तुमच्या घरात खूप सकारात्मकता आणि शांती आणेल.
संबंंधीत बातम्या :
lucky charms | घरातून बाहेर गेल्यावर ‘या’ 4 गोष्टी पाहिल्यात तर तुमचं काम झालंच म्हणून समजा