भगवान विष्णूचे परम भक्त आहेत देवर्षी नारद, का दिला आपल्याच पित्याला इतका मोठा शाप, जाणून घ्या

| Updated on: Aug 11, 2021 | 8:38 AM

शास्त्रांमध्ये नारदांना देवाचे 'मन' म्हटले गेले आहे, म्हणूनच देवाच्या मनात जे काही असते ते सर्व नारदजींना माहित असते. नारद मुनी आपल्या आराध्य श्री नारायणाची स्तुती करण्यात नेहमी मग्न असतात. नारद मुनींना पुराणातील प्रत्येक ठिकाणी राजर्षी आणि महर्षींच्या वर देवर्षीचे संबोधन देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

भगवान विष्णूचे परम भक्त आहेत देवर्षी नारद, का दिला आपल्याच पित्याला इतका मोठा शाप, जाणून घ्या
narad-rishi
Follow us on

मुंबई : शास्त्रांमध्ये नारदांना देवाचे ‘मन’ म्हटले गेले आहे, म्हणूनच देवाच्या मनात जे काही असते ते सर्व नारदजींना माहित असते. नारद मुनी आपल्या आराध्य श्री नारायणाची स्तुती करण्यात नेहमी मग्न असतात. नारद मुनींना पुराणातील प्रत्येक ठिकाणी राजर्षी आणि महर्षींच्या वर देवर्षीचे संबोधन देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी त्यांची ब्रह्मर्षी म्हणूनही पूजा केली जाते. पौराणिक कथा वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर हे ज्ञात होते की त्यांची पोहोच ब्रह्मलोकापासून देवलोक आणि राक्षसांच्या राजमहालांपासून मृत्यूलोकपर्यंत आहे.

वडिलांकडून मिळाला हा मोठा शाप

ब्रह्माजींच्या कंठातून जन्माला आल्यामुळे देवर्षी नारद मानसपुत्र मानले गेले. एकदा ब्रह्माजींनी त्यांना ब्रह्मांडाचा विस्तार करण्याचा आदेश दिला, तेव्हा नारदजींनी त्यांनी विषय भोगातील भक्तीतील सर्वात मोठा अडथळा सांगितला आणि सांगितले की भगवान पुरुषोत्तम हे सर्वात आदिकारण आणि विस्ताराचे बीज आहे. तेच आपल्या भक्तांना आश्रय देणारे आहेत. अशा परिस्थितीत, भक्तांचे आराध्य आणि त्यांचे प्रिय परमेश्वर भगवान श्रीकृष्ण वगळता कोणी मूर्खच असेल विनाशकारी विषयात लक्ष घालेल. अमृतासारखे अति प्रिय भगवान श्रीकृष्णाची सेवा सोडून कोण मूर्ख विषय रुपी वस्तूत कोण लक्ष घालेल?

देवर्षी नारदांचे असे उत्तर ऐकून ब्रह्माजींना खूप राग आला. जेव्हा त्यांनी स्वतःच्या मुलाला अशा प्रकारे सृष्टीच्या कार्यापासून दूर जाताना पाहिले तेव्हा त्यांना राग आला आणि त्यांनी नारदाला शाप दिला. ‘नारदा! तू माझ्या आज्ञेची अवहेलना केली आहेस, म्हणून तुझे सर्व ज्ञान माझ्या शापाने नष्ट होईल आणि तू गंधव योनीला प्राप्त होऊन श्रृंगार-विलासी कामिनींच्या वशिभूत होशील.

तेव्हा नारदांनी वडिलांनाही शाप दिला

ब्रह्माजींकडून शाप मिळाल्यानंतर नारदजींनी दु:खी होऊन आपल्या पित्याला म्हटले, वडिलांना वाटेल तर ते आपल्या कुमार्गी पुत्राला शाप देतील किंवा त्याचा त्याग करतील, पण तुम्ही तुमच्या तपस्वी मुलाला शाप देणे योग्य समजले. आता माझ्यावर एवढी कृपा करा की ज्या योनीमध्ये मी जन्मला येतील त्यामध्ये माझ्या सोबत नेहमी भगवंताची भक्ती नेहमी राहावी. देवर्षी नारदांनी ब्रह्माजींना सांगितले की तुम्ही कोणत्याही कारणाशिवाय मला शाप दिला आहे, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की जगात तुमची तीन कल्पांपर्यंत पूजा केली जाणार नाही आणि तुमच्यासोबत तुमचे मंत्र, स्तोत्र, कवचन इत्यादी लुप्त होतील.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

भगवान शिवशंकरांनी आपल्या गळ्यात नाग का धारण केला? जाणून घ्या यामागील कारण

Benefits of tilak : शुभतेसाठी दिवसानुसार लावा टिळा, नशीब चमकेल आणि भाग्य उजळेल